Gold Silver Rate Today: आज ५ मार्च २०२६ रोजी सोन आणि चांदीच्या किमतींमध्ये वाढ पाहायला मिळत आहे. सोने-चांदीच्या किमतींसोबतच क्रिप्टो मार्केटमध्येही तेजी असण्याचं चित्र फार कमी वेळा पाहायला मिळतं. कमोडिटी मार्केटमध्ये तेजी परतली असली तरी, सोने आणि चांदीचे दर अजूनही त्यांच्या 'ऑल टाइम हाय'पेक्षा बरेच खाली आहेत. विशेषतः चांदीच्या किमतीत तर १,५०,००० रुपयांहून अधिकचा फरक आहे. हीच स्थिती आंतरराष्ट्रीय वायदा बाजारातही दिसून येत आहे.
सोने-चांदीचा आजचा ताजा भाव किती?
मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडियावर (MCX) सोन्याचा भाव १,६२,५५५ रुपये प्रति दहा ग्रॅम आणि चांदीचा भाव २,६९,८९५ रुपये प्रति किलोग्राम झालाय. ४ मार्च रोजी सोन्याची किंमत १,६१,५५० रुपये प्रति दहा ग्रॅम होती आणि चांदी २,६६,१५० रुपये प्रति किलोग्रामवर बंद झाली होती. आज कॉमेक्स वर सोन्याचा दर $५,१८१.६० प्रति औंस आणि चांदीचा दर $८५.२०० प्रति औंस झालाय.
सोने-चांदीचा 'ऑल टाइम हाय' रेकॉर्ड
२९ जानेवारी २०२६ रोजी सोने आणि चांदीच्या किमतींनी आपला ऐतिहासिक उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोनं १,८०,००० रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी ४,२०,००० रुपये प्रति किलोग्रामवर पोहोचली होती. म्हणजेच, या ऐतिहासिक उच्चांकाच्या तुलनेत सोन्याचा भाव अजूनही १७,४४५ रुपये प्रति दहा ग्रॅमनं कमी आहे. याशिवाय चांदीचा भावदेखील १,५०,१०५ रुपये प्रति किलोग्रामनं कमी आहे.
दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमधील सोन्याचे दर
दिल्ली: येथे २२ कॅरेट सोन्याचा दर १,५०,९४० रुपये प्रति १० ग्रॅम आणि १८ कॅरेट सोन्याची किंमत १,२३,५२० रुपये प्रति दहा ग्रॅम झाली आहे.
मुंबई: २४ कॅरेट सोन्याची किंमत १,६३,५३० रुपये प्रति १० ग्रॅम, २२ कॅरेट सोन्याचा भाव १,४९,९०० रुपये प्रति १० ग्रॅम आणि १८ कॅरेट गोल्ड रेट १,२२,६५० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.
चेन्नई: आज २४ कॅरेट सोन्याची किंमत १,६४,९५० रुपये प्रति १० ग्रॅम, २२ कॅरेट सोन्याचा दर १,५१,२०० रुपये प्रति १० ग्रॅम आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव १,३०,३९० रुपये प्रति १० ग्रॅम झालाय.
कोलकाता: आज २४ कॅरेट सोन्याचा भाव १,६३,५३० रुपये प्रति दहा ग्रॅम झाला असून २२ कॅरेट सोन्याची किंमत १,४९,९०० रुपये प्रति दहा ग्रॅम झालीये.
Web Summary : Gold and silver prices increased today, contrasting with recent trends. While commodity markets are recovering, gold and silver remain below record highs. MCX gold is ₹1,62,555/10g, silver ₹2,69,895/kg. City rates vary: Mumbai (₹1,63,530/10g 24K gold), Delhi (₹1,50,940/10g 22K gold), Chennai (₹1,64,950/10g 24K gold), Kolkata (₹1,63,530/10g 24K gold).
Web Summary : आज सोने और चांदी की कीमतों में वृद्धि हुई। कमोडिटी बाजार में सुधार हो रहा है, फिर भी सोना और चांदी रिकॉर्ड ऊंचाई से नीचे हैं। एमसीएक्स पर सोना ₹1,62,555/10 ग्राम, चांदी ₹2,69,895/किलोग्राम है। मुंबई (₹1,63,530/10 ग्राम 24K सोना), दिल्ली (₹1,50,940/10 ग्राम 22K सोना), चेन्नई (₹1,64,950/10 ग्राम 24K सोना), कोलकाता (₹1,63,530/10 ग्राम 24K सोना) में अलग-अलग दरें हैं।