Join us
Daily Top 2Weekly Top 5

चांदीच्या दरात ४७४५ रुपयांची घसरण, सोन्याच्या किमतीतही मोठी घट; पटापट चेक करा नवे दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 14:42 IST

Gold Silver Price Today: अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तापूर्वी सोन्याच्या किमतीत घट पाहायला मिळाली आहे. खरेदीपूर्वी पाहा काय आहेत सोन्या-चांदीचे नवे दर.

Gold Silver Price Today: अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तापूर्वी सोन्याच्या किमतीत घट पाहायला मिळाली आहे. कालच्या तुलनेत आज शुक्रवारी २४ कॅरेट सोन्याचा दर १,९४७ रुपयांनी कमी झाला आहे. सोन्यासोबतच चांदीच्या किमतीतही घसरण झाली असून, सोने खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. 'इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन'नं (IBJA) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, आज १७ एप्रिल रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर १,५१,३५८ रुपये प्रति १० ग्रॅमवर आहे. गुरुवारी दुपारपर्यंत हा दर १,५३,३०५ रुपये होता.

२३ ते १४ कॅरेट सोन्याचे आजचे दर 

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशननुसार, इतर कॅरेटच्या सोन्याचे दर खालीलप्रमाणे आहेत:

२३ कॅरेट: १,५०,७५२ रुपये प्रति १० ग्रॅम.२२ कॅरेट: १,३८,६४४ रुपये प्रति १० ग्रॅम.१८ कॅरेट: १,१३,५१९ रुपये प्रति १० ग्रॅम.१४ कॅरेट: ८८,५४४ रुपये प्रति १० ग्रॅम.

Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?

चांदीचा आजचा नवा दर

Ibjarates नुसार, आज शुक्रवारी चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. १ किलो चांदीचा दर आता २,४७,९३० रुपये झाला आहे. गुरुवारी दुपारी चांदी २,५२,६७५ रुपये प्रति किलो होती. म्हणजेच चांदीच्या किमतीत ४,७४५ रुपयांची घट झाली आहे.

का घसरले सोन्याचे भाव?

सोन्याच्या किमतीत घट होण्यामागे अनेक कारणे असली, तरी सध्याच्या घसरणीचं मुख्य कारण डॉलरचं वधारलेलं मूल्य हे आहे. गुंतवणूकदार सध्या सोन्याऐवजी डॉलरला सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पाहत आहेत, ज्यामुळे सोन्या-चांदीच्या किमतीत ही मोठी हालचाल दिसून येत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Gold and Silver Prices Plunge Before Akshay Tritiya: Check New Rates

Web Summary : Gold prices fell sharply before Akshay Tritiya, with 24-carat gold down ₹1,947. Silver also saw a significant drop of ₹4,745 per kg. The price drop is attributed to a stronger dollar attracting investors.
टॅग्स :सोनंचांदीगुंतवणूक