Join us
Daily Top 2Weekly Top 5

जर दुबईवरुन सोनं आणलं तर किती लागेल टॅक्स? तुम्हाला स्वस्त पडेल की महाग? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 15:29 IST

Tax on Gold Buy In Dubai: दुबई आपल्या शुद्धतेमुळे आणि कमी किमतीमुळे जगभरात 'सिटी ऑफ गोल्ड' म्हणून प्रसिद्ध आहे. भारतीयांसाठी दुबईची सहल तिथून सोनं खरेदी केल्याशिवाय अपूर्ण मानली जाते.

Tax on Gold Buy In Dubai: दुबई आपल्या शुद्धतेमुळे आणि कमी किमतीमुळे जगभरात 'सिटी ऑफ गोल्ड' म्हणून प्रसिद्ध आहे. भारतीयांसाठी दुबईची सहल तिथून सोनं खरेदी केल्याशिवाय अपूर्ण मानली जाते. ६ फेब्रुवारी रोजी दुबईत २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत १४६,१३० रुपये आहे, तर भारतात ती १५१,४९० रुपये आहे. म्हणजेच दुबईत सोने प्रति १० ग्रॅम सुमारे पाच हजार रुपयांनी स्वस्त आहे. मात्र, तिथून सोने आणणं नेहमीच फायदेशीर ठरतं का? हे समजून घेणं आवश्यक आहे.

दुबईत सोनं स्वस्त असण्याची कारणं

दुबईत सोनं स्वस्त असण्यामागे दोन मुख्य कारणं आहेत. पहिलं म्हणजे तिथे सोन्यावर कोणताही जीएसटी (GST) लागत नाही, तर भारतात ३% जीएसटी अनिवार्य आहे. दुसरे म्हणजे, दुबईत मेकिंग चार्जेस खूप कमी आहेत. भारतात मेकिंग चार्जेस सरासरी १२% आहेत, तर दुबईत ते केवळ ८% आहेत.

सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा मोठी घसरण; चांदी एका झटक्यात १३,१५५ रुपयांनी स्वस्त, सोन्याचे दरही उतरले, पाहा नवे दर

टॅक्स फ्री सोनं आणण्याची मर्यादा

भारतीय सीमा शुल्क (Customs) नियमांनुसार, पुरुष आणि महिला प्रवाशांसाठी ड्युटी-फ्री सोने आणण्याची मर्यादा वेगवेगळी आहे:पुरुष प्रवासी: जास्तीत जास्त २० ग्रॅम सोनं (किंमत ५०,००० रुपयांपेक्षा जास्त नसावी) विना कर आणू शकतात. यापेक्षा जास्त सोने असल्यास ३% ते १०% पर्यंत कस्टम ड्युटी द्यावी लागते.

महिला प्रवासी: महिलांना अधिक सवलत असून त्या ४० ग्रॅम सोनं (कमाल किंमत १ लाख रुपये) विना शुल्क आणू शकतात. ४० ग्रॅमच्या मर्यादेनंतर वजनानुसार ३%, ६% आणि १०% टॅक्स लागू होतो.

मुलं: १५ वर्षांखालील मुले देखील ४० ग्रॅमपर्यंत सोन्याचे दागिने ड्युटी न भरता आणू शकतात. यासाठी पालकांना खरेदीचे वैध बिल दाखवणे अनिवार्य आहे.

मुक्काम आणि सोन्याची मर्यादा

जर तुम्ही दुबईत ६ महिन्यांहून अधिक काळ राहून परतत असाल, तर तुम्ही चेक-इन बॅगेजमध्ये १ किलोपर्यंत सोने आणू शकता, ज्यावर सुमारे १३.७% कस्टम ड्युटी द्यावी लागेल. मात्र, जर तुम्ही केवळ सहलीसाठी गेला असाल (६ महिन्यांपेक्षा कमी काळ), तर मर्यादेपेक्षा जास्त सोन्यावर सुमारे ३८.५०% शुल्क भरावं लागू शकतं.

१ एप्रिल २०२६ पासून नवीन नियम

सरकार १ एप्रिल २०२६ पासून 'Baggage Rules 2026' लागू करणार आहे. यानुसार, दागिन्यांची जुनी 'व्हॅल्यू लिमिट'  संपवून आता केवळ 'वजनाच्या आधारावर' ड्युटी-फ्री सवलत दिली जाईल. जर प्रवाशानं परदेशात एक वर्षापेक्षा जास्त काळ व्यतीत केला असेल, तर दागिन्यांची किंमत कितीही असली तरी वजनाच्या मर्यादेत असल्यास टॅक्स लागणार नाही.

दुबईतून सोनं खरेदी फायदेशीर की महाग?

जर तुम्ही कुटुंबाच्या एकत्रित ड्युटी-फ्री मर्यादेत (उदा. पती-पत्नी मिळून ६० ग्रॅम) सोनं आणत असाल, तर ते नक्कीच स्वस्त पडतं. परंतु, गुंतवणुकीच्या उद्देशानं जास्त सोनं आणल्यास कस्टम ड्युटी आणि कन्व्हर्जन रेटमुळे ते भारताच्या किमतीएवढे किंवा त्याहूनही महाग पडू शकते. उदाहरणार्थ, ६ महिन्यांच्या वास्तव्यानंतर १०० ग्रॅम सोनं आणल्यास, सूट मिळून उरलेल्या ८० ग्रॅमवर १३.७% ड्युटी भरावी लागेल, ज्यामुळे तुमची झालेली ९% बचत टॅक्समध्येच खर्च होईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Dubai Gold: Tax implications and cost-effectiveness for Indian buyers.

Web Summary : Dubai gold is cheaper due to no GST and lower making charges. Duty-free limits exist for Indian travelers. Staying over 6 months allows 1kg gold with 13.7% duty. Baggage Rules 2026 focus on weight. Buying within limits is cost-effective, exceeding limits may negate savings.
टॅग्स :सोनंचांदीदुबई