Gold Silver Price Crash : गेल्या काही दिवसांपासून विक्रमी पातळीवर पोहोचलेले सोन्या-चांदीचे दर आता वेगाने घसरत आहे. दिवाळीचा सण संपला असून लवकरच लग्नसराईचा हंगाम सुरू होत आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. जागतिक बाजारातील कमजोर संकेतांमुळे सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण सुरूच आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर काल (मंगळवारी) अचानक सोन्यात ३,००० रुपयांपेक्षा जास्त आणि चांदीच्या दरातही ३,००० रुपयांची मोठी घसरण दिसून आली. मौल्यवान धातूनच्या किमती आणखी खाली येणार का? असा प्रश्न सामान्यांच्या मनात येत आहे.
जागतिक बाजारात झालेली कमजोरी, अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार तणाव कमी होण्याची आशा आणि अमेरिकन डॉलरचे वाढलेले मूल्य यामुळे या मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी पडझड झाली आहे.
एमसीएक्स वर किमतींमध्ये मोठी घट
| धातू | सुरुवातीची घसरण | उघडण्याचा दर | बाजार बंद होतानाचा दर | घसरण (%) |
| सोने (१० ग्रॅम) | ०.७% | ₹१,२०,१०६ | ₹१,१८,४६१ | २.०६% |
| चांदी (१ किलो) | ०.६९% | ₹१,४२,३६६ | ₹१,४१,४२४ | १.३६% |
विक्रमी उच्चांकावरुन इतके स्वस्त झाले सोने-चांदीसोने: एमसीएक्सनुसार, सोन्याचा विक्रमी दर १.३२ लाखाहून अधिक होता, तो आता १.१८ लाखांवर आला आहे. म्हणजेच, सोन्याच्या दरात १३,००० रुपयांपेक्षा जास्त घट झाली आहे.चांदी: चांदीचा विक्रमी दर १.७० लाख रुपये प्रति किलो होता, तो आता १.४१ लाख रुपये प्रति किलो वर आला आहे. म्हणजेच, चांदीच्या भावात २९,००० रुपयांपर्यंतची मोठी घसरण झाली आहे.
सोन्या-चांदीचे भाव का घसरत आहेत?नफावसुलीचा दबाव: दोन महिन्यांच्या जोरदार तेजीनंतर आता व्यापारी मोठ्या प्रमाणात नफावसुली करत आहेत.मानसिक स्तराची घसरण : दोन्ही धातू प्रमुख मानसिक स्तरांच्या खाली घसरले आहेत (सोने ४,००० डॉलर आणि चांदी ४७ डॉलर प्रति औंसच्या खाली).डॉलरची मजबुती आणि व्यापार आशावाद: मजबूत डॉलर इंडेक्स आणि चीन-भारत यांच्यासह अमेरिकेच्या व्यापार वाटाघाटींबाबतच्या नवीन आशावादामुळे सोन्या-चांदीवर विक्रीचा दबाव आहे.भू-राजकीय तणाव कमी: गाझा शांतता चर्चेत आलेल्या गतीमुळे भू-राजकीय चिंता कमी झाल्या आहेत, ज्यामुळे 'सेफ हेवन' म्हणून सोन्याची मागणी घटली आहे.
केंद्रीय बँकांवर गुंतवणूकदारांचे लक्षगुंतवणूकदारांचे लक्ष आता केंद्रीय बँकांच्या व्याजदर कपातीच्या निर्णयावर आहे. अमेरिकेतील महागाईचे आकडे नरम आल्यामुळे अमेरिकन फेडरल रिझर्व्ह व्याजदरात २५ आधार अंकांची कपात करण्याची घोषणा करू शकते, तर युरोपियन सेंट्रल बँक आणि बँक ऑफ जपानकडून सध्याची धोरणे कायम ठेवण्याची अपेक्षा आहे.
वाचा - पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
तज्ज्ञांच्या मते, जर व्याजदरात अपेक्षेपेक्षा कमी कपातीचे संकेत मिळाले किंवा व्यापार करार अधिक सकारात्मक झाले, तर सोन्याच्या किमतीवर आणखी दबाव येऊ शकतो. अल्प कालावधीत आणखी घसरण होण्याची शक्यता दर्शना देसाई (एस्पेक्ट बुलियन अँड रिफायनरीचे सीईओ) यांनीही व्यक्त केली आहे.
Web Summary : Gold and silver prices have fallen sharply from record highs due to global factors and profit-taking. Gold dropped ₹13,000 and silver ₹29,000. Experts cite reduced geopolitical tensions and dollar strength.
Web Summary : वैश्विक कारकों और मुनाफावसूली के कारण सोने और चांदी की कीमतों में रिकॉर्ड ऊंचाई से भारी गिरावट आई है। सोने में ₹13,000 और चांदी में ₹29,000 की गिरावट आई। विशेषज्ञ भू-राजनीतिक तनाव में कमी और डॉलर की मजबूती को कारण बताते हैं।