Join us

Gold Silver Price 14 July: चांदीनं तोडले सर्व रेकॉर्ड, एका झटक्यात ₹३४८३ ची वाढ; सोन्यातही मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 13:06 IST

Gold Silver Price 14 July: गरिबांचं सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चांदीच्या किमती आता गगनाला भिडल्या आहेत. आज सराफा बाजारात चांदी एका झटक्यात ३४८३ रुपयांनी महागली.

Gold Silver Price 14 July: गरिबांचं सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चांदीच्या किमती आता गगनाला भिडल्या आहेत. आज सराफा बाजारात चांदी एका झटक्यात ३४८३ रुपयांनी महागली आणि १,१३,७७३ रुपये प्रति किलो या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली. तर, एमसीएक्सवर ती १,१४,८०० च्या आसपास व्यवहार करत होती. सोन्याच्या किमतीतही ५८६ रुपयांनी वाढ झाली आहे आणि ते ९८,०९७ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचलं आहे. आज, सोमवार १४ जुलै रोजी, जीएसटीसह २४ कॅरेट सोनं १,०१,०३९ रुपये प्रति १० ग्रॅम दरानं विकलं जात असताना, चांदी १,१७,१८६ रुपये प्रति किलोनं विकली जात आहे.

आयबीजेएच्या दरांनुसार, २३ कॅरेट सोनं देखील ५८४ रुपयांनी महाग झालं आणि ते ९७,७०५ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडलं. जीएसटीसह त्याची किंमत आता १,००,६३६ रुपये झाली. त्यात मेकिंग चार्जेसचा समावेश करण्यात आलेला नाही. दागिन्यांसाठी जारी केलेल्या दरांबद्दल बोलायचं झाले तर, २२ कॅरेट सोन्याची किंमत ८९,८५७ रुपये प्रति १० ग्रॅम आहे. जीएसटीसह ती ९२,५५२ रुपये आहे. आज १८ कॅरेट सोन्याची किंमत ७३,७५३ रुपये आहे आणि जीएसटीसह ती ७५,९६५ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचलीये.

Anthem Biosciences IPO आजपासून गुंतवणुकीसाठी खुला; कधीपर्यंत आणि किती करावी लागेल गुंतवणूक, GMP किती?

सोने आणि चांदीचे स्पॉट रेट इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनद्वारे (IBJA) जाहीर केले जातात. तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकतो. IBJA दिवसातून दोनदा दर जाहीर करते. एकदा दुपारी १२ वाजता आणि दुसऱ्यांदा संध्याकाळी ५ वाजता दर जाहीर केले जातात.

चांदीनं सोन्याला मागे टाकलं

या वर्षी सराफा बाजारात सोनं सुमारे २२,३५७ रुपयांनी आणि चांदी २७,७५६ रुपयांनी महाग झाली आहे. ३१ डिसेंबर २४ रोजी सोनं प्रति १० तोळे ७६,०४५ रुपये आणि चांदी ८५,६८० रुपये प्रति किलोवर उघडली. या दिवशी सोनं ७५,७४० रुपयांवर बंद झालं. चांदी देखील ८६,०१७ रुपये प्रति किलोवर बंद झाली. तर, जूनमध्येच सोन्याच्या किमतीत २१०३ रुपयांची वाढ झाली असताना, चांदी ९६२४ रुपयांनी वाढली.

टॅग्स :सोनंचांदीपैसा