Gold Rate Fall In One Week :सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. गेल्या एका आठवड्यात सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे, ज्यामुळे सोने खरेदी करणे आता स्वस्त झाले आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) आणि देशांतर्गत दोन्ही बाजारांमध्ये सोन्याच्या दरात लक्षणीय घट झाली आहे.
एमसीएक्सवर मोठी घसरणगेल्या आठवड्यात, मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर २० जून रोजी २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९९,१०९ रुपये होती, ती २७ जूनपर्यंत ती ९५,५२४ रुपयांवर आली आहे. म्हणजेच, एका आठवड्यात सोन्याच्या दरात तब्बल ३,५८५ रुपयांची घट झाली आहे. विशेष म्हणजे, सोने त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीपेक्षा ५,५५४ रुपयांनी स्वस्त झाले आहे.
देशांतर्गत बाजारातील दरइंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या आकडेवारीनुसार, देशांतर्गत बाजारातही सोन्याच्या दरात घट झाली आहे. २९ जून रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर ९५,७८० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे, जो एका आठवड्यात २,९११ रुपयांनी कमी झाला आहे. इतर शुद्धतेच्या सोन्याचे दर खालीलप्रमाणे आहेत.
- २४ कॅरेट सोने: ९५,७८० रुपये/१० ग्रॅम
- २२ कॅरेट सोने: ९३,४९० रुपये/१० ग्रॅम
- २० कॅरेट सोने: ८५,२५० रुपये/१० ग्रॅम
- १८ कॅरेट सोने: ७७,५९० रुपये/१० ग्रॅम
खरेदी करताना हे लक्षात ठेवाजेव्हा तुम्ही सराफा दुकानातून दागिने खरेदी करता, तेव्हा या दरावर ३% जीएसटी आणि मेकिंग चार्ज वेगळा लागतो. त्यामुळे दागिन्यांची अंतिम किंमत वाढते. दागिन्यांची शुद्धता जाणून घेण्यासाठी त्यावर असलेला 'हॉलमार्क' नक्की तपासा.
वाचा - ३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
दर कसे तपासाल?तुम्ही तुमच्या शहरातील सोन्याचे दर अगदी सहज तपासू शकता. यासाठी तुम्हाला ८९५५६६४४३३ या क्रमांकावर एक मिस्ड कॉल द्यावा लागेल. थोड्याच वेळात तुम्हाला एसएमएसद्वारे नवीन दर मिळतील. याशिवाय, तुम्ही ibjarates.com या अधिकृत वेबसाइटला भेट देऊनही दर तपासू शकता.