Join us

सोन्याचा भाव स्वस्त झाला की वाढला? १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर आठवडाभरात कुठे पोहोचला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 13:15 IST

Gold Rate : गेल्या आठवडाभरात सोन्याच्या दरात मोठा बदल झाला असून सोन्याच्या किमतीत प्रति १० ग्रॅम २००० रुपयांनी वाढ झाली आहे. एमसीएक्सवरून देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे.

Gold Rate : गेल्या वर्षभरापासून सोन्याचा भाव चांगलाच वधारला आहे. एकट्या जानेवारी महिन्यात सोने तब्बल ६ हजार रुपयांनी महाग झाले आहे. तर वर्षभरात मौल्यवान धातूची किंमत १७ हजार रुपयांनी वाढली आहे. सध्या शुद्ध १० ग्रॅम सोन्यासाठी ८३ हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागत आहे. गेल्या एका आठवड्याबद्दल बोलायचे झाले तर, केवळ मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वरच नव्हे तर देशांतर्गत बाजारातही सोने महाग होत आहे. या काळात त्याची किंमत प्रति १० ग्रॅम २००० रुपयांनी वाढली आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर सोन्याच्या दर कसा बदलला?मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर सोन्याच्या भावी किमतींमध्ये एका आठवड्यात मोठा बदल झाला आहे. मौल्यावन धातू सतत नवीन विक्रमी उच्च पातळीवर गेला आहे. आठवडाभरापूर्वी, ३१ जानेवारीला (शुक्रवारी) ४ एप्रिल रोजी एक्सपायरी असलेल्या २४ कॅरेट सोन्याचा फ्युचर्स भाव ८२,२३३ रुपये प्रति १० ग्रॅम होता. आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी ७ फेब्रुवारी रोजी सोन्याने ८५,२७९ रुपये प्रति १० ग्रॅमचा नवीन उच्चांक गाठला. यानंतर व्यापाराच्या शेवटी त्याच्या किमतीत काही घसरण झाली. तरीही ते ४५६ रुपयांच्या वाढीसह ८४,८८८ रुपयांवर बंद झाला. त्यानुसार हिशोब केला तर एका आठवड्यात सोन्याचा भाव २६५५ रुपये प्रति १० ग्रॅमने वधारला आहे.

देशांतर्गत बाजारात सोन्याचा भावभारतीय बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, स्थानिक बाजारातील सोन्याच्या किमत ३१ जानेवारी रोजी ८२,०८६ रुपये होती, जी शुक्रवारी ७ फेब्रुवारीला वाढून ८४,७०० रुपये झाली. म्हणजेच आठवडाभरातच देशांतर्गत बाजारात सोने २,६१४ रुपयांनी महागले आहे.

सोन्याचा दर्जा  किंमत (प्रति 10 ग्रॅम, रुपयांमध्ये) 
२४ कॅरेट सोने ८४,७०० रुपये
२२ कॅरेट सोने ८२,६७० रुपये
२० कॅरेट सोने ७५,३८० रुपये
१८ कॅरेट सोने६८,६१० रुपये
१४ कॅरेट सोने५४,६३० रुपये

IBJA वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या या सोन्याच्या किमती GST आणि मेकिंग चार्जेसशिवाय आहेत. वेगवेगळ्या शहरांमध्ये गोल्ड मेकिंग चार्जेस वेगवेगळे असतात आणि त्यामुळे सोन्याची किंमत बदलू शकते.

सोन्याची किंमत अजून किती वाढू शकते?चालू आर्थिक वर्षातही सोन्याचा भाव वाढणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ८५ हजार रुपयांची पातळी ओलांडल्यानंतर सोन्याच्या गुंतवणूकदारांमध्ये प्रॉफिट बुकींग वरचढ ठरू शकते. अशावेळी भाव घसरुन ८२ ते ८३ हजार रुपयांपर्यंत येऊ शकतात. तर काही तज्ज्ञांच्या मते चालू आर्थिक वर्षात सोन्याची किंमत ८६,५०० रुपये प्रति दहा ग्रॅमपर्यंत पोहोचू शकते. एका मोठ्या बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सोन्याची किंमत वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. अशा परिस्थितीत येत्या दोन महिन्यांत सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :सोनंगुंतवणूकशेअर बाजार