Gold Silver Price: सोन्याच्या किंमतींमध्ये सुरू असलेली तेजी थांबण्याचे नाव घेत नाहीये. या वर्षात सोन्याचे दर आतापर्यंत जवळपास ५० टक्क्यांनी वाढले आहेत. तर, जर आपण २०२२ सालापासून पाहिलं, तर सोन्याच्या दरांमध्ये १४० टक्क्यांची जोरदार वाढ झाली आहे. तज्ज्ञांचे म्हणणं आहे की जागतिक स्तरावर सुरू असलेले सध्याचे आर्थिक बदल आणि मौद्रिक धोरणाशी संबंधित अपेक्षांमुळे सोन्याच्या किंमतींमध्ये तेजी कायम आहे आणि या धनत्रयोदशीला सोन्याचे दर विक्रमी उच्चांकावर पोहोचू शकतात. ही माहिती मनीकंट्रोलच्या एका रिपोर्टमध्ये दिली आहे.
१.५० लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतात दर
मनीकंट्रोलच्या रिपोर्टमध्ये एसएमसी ग्लोबल सिक्युरिटीजमध्ये कमोडिटी रिसर्चच्या प्रमुख वंदना भारती यांनी म्हटलंय की, 'सेंट्रल बँक आणि ईटीएफकडून होणाऱ्या मजबूत खरेदीमुळे किंमतींमध्ये वाढ दिसून येईल.' या धनत्रयोदशीला सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम १,२०,००० ते १,३०,००० दरम्यान राहू शकतात, असं त्यांचं मत आहे. त्यांनी सांगितलंय की, २०२६ च्या सुरुवातीला सोन्याचे दर १,५०,००० रुपयांपर्यंत जाऊ शकतात.
किसान क्रेडिट कार्डाचं लोन फेडलं गेलं नाही तर काय होतं? जमीन जाऊ शकते का, पाहा काय आहे नियम?
एमसीएक्सवर १,२२,२८४ रुपयांपर्यंत पोहोचले सोन्याचे दर
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) डिसेंबर कॉन्ट्रॅक्टसाठी सोन्याचे दर या आठवड्यात आधीच १,२२,२८४ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले आहेत, जे जागतिक आणि देशांतर्गत घटकांच्या मिश्रणाचे संकेत देतात. याव्यतिरिक्त, जगभरातील सेंट्रल बँका सोनं खरेदी करण्यात गुंतलेल्या आहेत. जगभरातील देश आपले रिझर्व्ह डायव्हर्सिफाय करत आहेत, ज्यामुळे सोन्याची अधिकृत खरेदी अनेक दशकांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. या दरम्यान, एक्सचेंज ट्रेडेड फंड्समध्येही (ETF)चांगला इनफ्लो दिसून येत आहे, कारण इक्विटी मार्केट आणि बॉन्ड यील्ड्समध्ये चढ-उतार असताना गुंतवणूकदार सुरक्षित माध्यमांमध्ये गुंतवणूक करत आहेत.
ईटीएफमध्ये ९०२ दशलक्ष डॉलरचा इनफ्लो
वर्ल्ड गोल्ड काउंसिलनुसार (WGC) सप्टेंबर २०२५ मध्ये इंडियन गोल्ड ETF मध्ये ९०२ दशलक्ष डॉलरचा इनफ्लो झाला. ऑगस्टच्या तुलनेत यात २८५ टक्क्यांची वाढ दिसून आली. अमेरिका, यूके आणि स्वित्झर्लंड नंतर भारत जगभरात चौथ्या क्रमांकावर राहिला आहे. १७.३ अब्ज डॉलरच्या जागतिक इनफ्लोमध्ये भारताचं मोठं योगदान आहे.
Web Summary : Gold prices are surging, potentially reaching ₹1.3 lakh by Dhanteras and ₹1.5 lakh by 2026. Central bank buying and ETF inflows drive the rally amid global economic shifts.
Web Summary : सोने की कीमतें बढ़ रही हैं, जो धनतेरस तक ₹1.3 लाख और 2026 तक ₹1.5 लाख तक पहुंच सकती हैं। वैश्विक आर्थिक बदलावों के बीच केंद्रीय बैंक की खरीद और ईटीएफ प्रवाह से तेजी आ रही है।