Gold Price: २०२५ मध्ये गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिल्यानंतर आणि जानेवारी २०२६ मध्ये MCX वर ₹१,८०,७७९ प्रति १० ग्रॅमचा ऐतिहासिक उच्चांक गाठल्यानंतर सोन्यात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात MCX वर सोने ₹१,५६,२०० प्रति १० ग्रॅम या पातळीवर बंद झाले असून, ते उच्चांकापासून सुमारे १३.५ टक्क्यांनी खाली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातही दबाव
आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्यावर दबाव कायम आहे. COMEX वर सोने $५,६२६.८० प्रति औंसच्या उच्चांकावरून घसरून $५,०४६.३० प्रति औंसवर आले आहे. ही घसरण सुमारे १०.५ टक्क्यांची आहे. या पार्श्वभूमीवर आता प्रश्न उपस्थित होत आहे की, २०२७ पर्यंत सोने ₹१ लाखांखाली घसरणार का?
रशियाच्या डॉलरमध्ये परतण्याच्या चर्चेने खळबळ
ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, रशिया पुन्हा अमेरिकी डॉलरमध्ये ट्रेड सेटलमेंट करण्याचा विचार करत आहे. जर रशिया डॉलर-आधारित व्यवहारांकडे वळला, तर BRICS देशांच्या डी-डॉलरायझेशन मोहिमेला मोठा धक्का बसू शकतो. BRICS मध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे देश सामील आहेत.
सेंट्रल बँकांची खरेदी
२०२० ते २०२४ या कालावधीत जागतिक सोन्याच्या खरेदीपैकी ५०% पेक्षा जास्त हिस्सा सेंट्रल बँकांचा होता. मात्र, रशिया जर पुन्हा डॉलर-आधारित सेटलमेंट स्वीकारत असेल, तर सेंट्रल बँका सोने खरेदी थांबवू शकतात किंवा नफा वसुली करू शकतात.
$३००० प्रति औंसपर्यंत घसरण शक्य?
काही विश्लेषकांचा अंदाज आहे की, २०२७ पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोने $३००० प्रति औंसपर्यंत घसरू शकते. भारतात त्याची किंमत ₹९०,००० ते ₹१,००,००० प्रति १० ग्रॅम या श्रेणीत स्थिरावण्याची शक्यता आहे.
गुंतवणूकदारांसाठी संकेत
आर्थिक अनिश्चिततेच्या काळात सोने सुरक्षित गुंतवणूक मानले जाते. मात्र २००८ च्या आर्थिक संकटाचा अनुभव सांगतो की दीर्घकालीन सरकारी बाँड्स देखील सुरक्षित पर्याय ठरू शकतात.
(टीप- कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक तज्ञांचा सल्ला घ्या.)
Web Summary : Gold prices are fluctuating after hitting record highs. International markets face pressure. Russia's potential return to dollar settlements could impact BRICS de-dollarization and central bank gold purchases, potentially leading to further price drops. Analysts predict a fall to $3000/ounce by 2027.
Web Summary : सोने की कीमतें रिकॉर्ड ऊंचाई पर पहुंचने के बाद अस्थिर हैं। अंतर्राष्ट्रीय बाजारों पर दबाव है। रूस के संभावित रूप से डॉलर में लेनदेन करने से ब्रिक्स के डी-डॉलरीकरण और केंद्रीय बैंकों की सोने की खरीद पर असर पड़ सकता है, जिससे कीमतों में और गिरावट आ सकती है। विश्लेषकों ने 2027 तक $3000/औंस तक गिरावट का अनुमान लगाया है।