Gold-Silver Price : भारतीय शेअर बाजारात गेल्या आठवड्यात मोठी चढ-उतार पाहायला मिळाली. एका सत्रात निफ्टीने विक्रमी उच्चांक गाठला, तर दुसऱ्या सत्रात मोठी घसरण झाली. बाजारातील या अस्थिरतेच्या दरम्यान, सोन्याच्या दरांनी मात्र पुन्हा एकदा उभारणी घेतली आहे. गुंतवणूकदार नेहमी अस्थिर बाजारात सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहतात, याचा परिणाम या आठवड्यात दिसून आला.
सोन्याच्या दरात मोठी वाढगेल्या एका आठवड्यात सोन्याच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅममागे ७६० रुपयांनी महागले. तर २२ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅममागे ७०० रुपयांनी वाढले. २३ नोव्हेंबर रोजी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा दर १,२५,९९० रुपये प्रति १० ग्रॅम होता, तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोने ४,०६१.९१ डॉलर प्रति औंस दराने व्यवहार करत होते.
प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर (२३ नोव्हेंबर)दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता: २४ कॅरेट सोने: १,२५,८४० रुपये प्रति १० ग्रॅम (दिल्लीत १,२५,९९० रुपये)२२ कॅरेट सोने: १,१५,३५० रुपये प्रति १० ग्रॅम (दिल्लीत १,१५,५०० रुपये)या प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर जवळपास सारखेच होते.
चांदीच्या दरात मोठी घसरणसोन्याप्रमाणे चांदीच्या दरात वाढ झाली नाही, उलट या आठवड्यात चांदीच्या दरात मोठी घसरण झाली.सगेल्या आठवड्यात चांदीच्या दरात तब्बल ५,००० रुपये प्रति किलो इतकी घट झाली. तर २३ नोव्हेंबर रोजी चांदीचा भाव १,६४,००० रुपये प्रति किलो नोंदवला गेला. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा वायदा भाव ४९.५६ डॉलर प्रति औंस होता.
वायदा बाजारातील स्थितीवायदा बाजार म्हणजेच मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरही सोन्याच्या दरात वाढ आणि चांदीच्या दरात घसरण दिसून आली. सोन्याचा करार ५ डिसेंबर २०२५ रोजी एक्सपायर होणाऱ्या २४ कॅरेट सोन्याचे दर १४ नोव्हेंबरच्या १,२३,५६१ रुपये वरून वाढून १,२४,१९१ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले. तर चांदीचे दर १४ नोव्हेंबरच्या १,५६,०१८ रुपये प्रति किलोवरून घटून १,५४,१५१ रुपये प्रति किलोवर आले.
देशातील सोने आणि चांदीच्या किमतींवर स्थानिक आणि जागतिक अशा दोन्ही घटकांचा परिणाम होत असतो. बाजारातील अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदार सध्या पुन्हा सोन्याला सुरक्षित पर्याय मानत आहेत.
Web Summary : Amid stock market volatility, gold prices rose significantly, with 24-carat gold increasing by ₹760 per 10 grams. Silver prices, however, saw a sharp decline of ₹5,000 per kg. Investors are turning to gold as a safe haven.
Web Summary : शेयर बाजार की अस्थिरता के बीच सोने की कीमतों में उल्लेखनीय वृद्धि हुई, 24 कैरेट सोना ₹760 प्रति 10 ग्राम बढ़ा। हालांकि, चांदी की कीमतों में ₹5,000 प्रति किलो की तेज गिरावट देखी गई। निवेशक सोने को सुरक्षित ठिकाना मान रहे हैं।