Join us

सोन्याच्या किमतीने मोडले सर्व विक्रम! आता १० ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 15:35 IST

Gold Price All-Time High : जगभरात चालू असलेल्या आर्थिक आणि राजकीय अनिश्चिततेमुळे सोन्या-चांदीच्या किमती सातत्याने वाढत आहेत. आता तर सोन्याची किमती ऐतिहासिक उच्चांकावर पोहचली आहे.

Gold Price All-Time High : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे सर्वसामान्यांना आता तरी सोने आवक्यात येईल, अशी आशा होती. प्रत्यक्षात मौल्यावान धातूच्या किमतीने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले आहेत. बुधवारी (५ फेब्रुवारी २०२५) मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर सोन्याच्या किमतीने नवीन विक्रमी उच्चांक गाठला आहे. एप्रिल फ्युचर्स सोन्याने मागील सर्व विक्रम मोडीत काढत ८४,३९९ रुपये प्रति १० ग्रॅमची पातळी गाठली.

सोन्याची किंमत ऐतिहासिक उच्चांकीवरजगभरात चालू असलेल्या आर्थिक आणि राजकीय अनिश्चिततेमुळे सोन्या-चांदीच्या किमती गगनाला भिडत आहेत. गुंतवणूकदारच नाही तर देशांनीही सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याचे भांडार वाढवले आहेत. त्यामुळे त्यांच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. बुधवारी एमसीएक्स वर एप्रिल फ्युचर्स सोन्याने ८४,३९९ रुपये प्रति १० ग्रॅमचा नवा उच्चांक गाठला. दुपारी १२ वाजेपर्यंत ५१० रुपयांनी वाढून ८४,३०७ रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करत होता. शेवटच्या सत्रात तो ८३,७९७ रुपयांवर बंद झाला आणि आज तो ८४,०६० रुपयांवर उघडला.

चांदीही चमकलीकेवळ सोनेच नाही तर चांदीही चमकली आहे. मार्च फ्युचर्स चांदी ३०६ रुपयांनी वाढून ९६,०१५ रुपये प्रतिकिलो झाली. या आठवड्यात आतापर्यंत सोन्याचा भाव १,८०० रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी १,४०० रुपये प्रति किलोने महागली आहे. मंगळवारीही देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदी मजबूत होऊन बंद झाले.

ट्रम्प यांचे टॅरिफ वॉरचा परिणामचीन आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या टॅरिफ युद्धामुळे बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. ट्रम्प यांनी अलीकडेच चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर शुल्क वाढवण्याची घोषणा केली, त्यामुळे चीननेही प्रत्युत्तर दिले. या परिस्थितीमुळे गुंतवणूकदारांचा सोन्याकडे कल वाढला आहे. कारण ते सोन्याला सुरक्षित मालमत्ता मानतात. जसजसा व्यापार तणाव वाढत आहे, तसतशी सोन्याची मागणीही वाढत आहे, त्यामुळे त्याचे भाव वाढत आहेत.

टॅग्स :सोनंशेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक