Investment in Gold : यंदा परताव्याच्या बाबतीत सोन्याने शेअर बाजारालाही मागे टाकले आहे. जागतिक अनिश्चितता, भू-राजकीय तणाव आणि मध्यवर्ती बँकांची सातत्यपूर्ण खरेदी यामुळे २०२५ हे वर्ष सोन्यासाठी ऐतिहासिक ठरले आहे. या एका वर्षात सोन्याने तब्बल ७० टक्क्यांहून अधिक परतावा देऊन शेअर बाजारातील दिग्गज समभागांनाही मागे टाकले आहे. आता २०२६ कडे वाटचाल करताना गुंतवणूकदारांच्या मनात एकच प्रश्न आहे – सोन्याची ही सुसाट धाव पुढील वर्षीही कायम राहणार का?
२०२६ मध्ये किती वाढणार भाव?बाजारातील तज्ज्ञांच्या मते, २०२५ मध्ये मिळालेला ७० टक्क्यांसारखा असाधारण परतावा दरवर्षी मिळणे कठीण आहे. मात्र, तरीही सोन्यातील तेजीचे वातावरण कायम राहील. २०२६ मध्ये सोने १२ ते १५ टक्के परतावा देऊ शकते, असा अंदाज आहे. सध्या १० ग्रॅम सोन्याचा भाव सुमारे १,३५,००० रुपये आहे. २०२६ च्या अखेरीस हा दर १,५०,००० ते १,७०,००० रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. नफावसुलीमुळे काही काळ किंमत १,१८,००० रुपयांपर्यंत खाली येऊ शकते. मात्र, जागतिक परिस्थिती पाहता मोठी मंदी येण्याची शक्यता धूसर आहे.
३ लाखांच्या गुंतवणुकीवर किती नफा?जर एखाद्या गुंतवणूकदाराने डिसेंबर २०२५ च्या अखेरीस सोन्यामध्ये ३ लाख रुपये गुंतवले, तर १३ ते १५ टक्के सरासरी परताव्यानुसार, डिसेंबर २०२६ पर्यंत ही रक्कम वाढून ३.३६ लाख ते ३.४५ लाख रुपये होऊ शकते. सुरक्षित गुंतवणुकीचा विचार करता हा परतावा अत्यंत आकर्षक मानला जातो.
सोन्याचे दर कसे ठरतात?सोन्या-चांदीचे दर रोज बदलण्यामागे अनेक जागतिक आणि स्थानिक कारणे असतात.
- डॉलर आणि रुपयाचा खेळ : आंतरराष्ट्रीय बाजारात सोने डॉलरमध्ये विकले जाते. त्यामुळे डॉलर वधारला किंवा रुपया कमकुवत झाला की भारतात सोने महागते.
- करांचा बोजा : भारत आपल्या गरजेचा मोठा हिस्सा आयात करतो. त्यामुळे केंद्र सरकारची 'इंपोर्ट ड्युटी' आणि ३% जीएसटी थेट दरांवर परिणाम करतात.
- मध्यवर्ती बँकांची खरेदी : जागतिक मंदीच्या भीतीमुळे विविध देशांच्या मध्यवर्ती बँका आपल्या साठ्यात सोन्याचे प्रमाण वाढवत आहेत, ज्यामुळे मागणी वाढून दर वधारतात.
- लग्नसराई आणि सण : भारतात दिवाळी, अक्षय्य तृतीया आणि लग्नसराईच्या काळात सोन्याला मोठी मागणी असते. ही मागणी वाढली की स्थानिक सराफा बाजारात दरात तेजी येते.
वाचा - चांदीचे दर काय वाढले, चीनमध्ये १५-१५ किलोच्या पट्ट्या विकायला आल्या... व्हिडीओ व्हायरल
गुंतवणुकीसाठी सोने सुरक्षित का?जेव्हा शेअर बाजारात अस्थिरता असते किंवा दोन देशांमध्ये युद्धाची ठिणगी पडते, तेव्हा गुंतवणूकदार 'सुरक्षित मालमत्ता' म्हणून सोन्याकडे वळतात. महागाई वाढते तेव्हा पैशाचे मूल्य कमी होते. मात्र, सोन्याचे मूल्य टिकून राहते. त्यामुळेच २०२६ मध्येही सोने हा गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय म्हणून समोर येत आहे.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : Gold outperformed stocks this year. Experts predict 12-15% gold returns in 2026, potentially reaching ₹1,50,000-₹1,70,000 per 10 grams. A ₹3 lakh investment could grow to ₹3.36-₹3.45 lakh. Gold remains a safe investment amid market volatility.
Web Summary : इस साल सोने ने शेयरों को पछाड़ा। विशेषज्ञों का अनुमान है कि 2026 में सोने से 12-15% रिटर्न मिल सकता है, जो 10 ग्राम प्रति ₹1,50,000-₹1,70,000 तक पहुंच सकता है। ₹3 लाख का निवेश बढ़कर ₹3.36-₹3.45 लाख हो सकता है। बाजार की अस्थिरता के बीच सोना एक सुरक्षित निवेश है।