Gold-Silver Weekly Update: सोन्याच्या दरातील वाढ थांबण्याचे नाव घेत नाहीये. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला दरांमध्ये किरकोळ घसरण दिसली असली, तरी त्यानंतर सोन्याने विक्रमी वेगाने धाव घेत केवळ एकाच आठवड्यात नवी उच्चांकी पातळी गाठली आहे. जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर दरातील हा बदल लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. केवळ मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरच नाही, तर देशांतर्गत बाजारातही सोने महागले आहे.
एमसीएक्सवर सोन्याचा वायदा भाव वाढलामल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या वायदा भावात मोठी वाढ झाली आहे. गेल्या ५ सप्टेंबर रोजी ३ ऑक्टोबरची एक्सपायरी असलेल्या ९९९ शुद्धतेच्या सोन्याची किंमत १,०७,७२८ रुपये प्रति १० ग्रॅम होती. मात्र, १२ सप्टेंबर रोजी ही किंमत १,०९,३५६ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचली. यानुसार, सोन्याच्या वायदा भावात आठवड्याभरात १,६२८ रुपये प्रति १० ग्रॅमची वाढ झाली आहे.
देशांतर्गत बाजारातही सोन्याची चमक वाढलीइंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) वेबसाइटवरील दरांनुसार, देशांतर्गत बाजारातही सोन्याच्या किमती वाढल्या आहेत. ५ सप्टेंबर रोजी १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत १,०६,३३८ रुपये होती, ती १२ सप्टेंबर रोजी सायंकाळपर्यंत *१,०९,७०७ रुपये प्रति १० ग्रॅम वर पोहोचली. म्हणजेच, या एका आठवड्यात सोने ३,३६९ रुपये प्रति १० ग्रॅमने महागले आहे.
इतर कॅरेटच्या सोन्याच्या दरातही वाढ झाली आहे. १२ सप्टेंबर रोजी विविध कॅरेट सोन्याचे दर खालीलप्रमाणे होते.
सोन्याचे प्रकार | किंमत | प्रति १० ग्रॅम |
२४ कॅरेट सोने | १,०९,७०७ रुपये | प्रति १० ग्रॅम |
२२ कॅरेट सोने | १,०७,०७० रुपये | प्रति १० ग्रॅम |
२० कॅरेट सोने | ९७,६४० रुपये | प्रति १० ग्रॅम |
१८ कॅरेट सोने | ८८,८६० रुपये | प्रति १० ग्रॅम |
१४ कॅरेट सोने | ७०,७६० रुपये | प्रति १० ग्रॅम |
हे दर जीएसटी आणि घडणावळ (मेकिंग चार्जेस) वगळून आहेत, जे प्रत्यक्षात दागिने खरेदी करताना वाढतात.
वाचा - तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
चांदीच्या दरातही मोठी वाढसोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही वाढ सुरूच आहे. चांदीनेही गेल्या आठवड्यात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. ५ सप्टेंबर रोजी एक किलो चांदीचा भाव १,२३,१७० रुपये होता, तो १२ सप्टेंबर रोजी सायंकाळपर्यंत १,२८,००८ रुपये प्रति किलो वर पोहोचला. म्हणजेच, आठवड्याभरात एक किलो चांदीच्या दरात ४,८३८ रुपयांचा मोठा बदल दिसून आला आहे.