Union Budget
Lokmat Money >गुंतवणूक > अवघ्या ३६ दिवसांत सोनं ७,४०० रुपयांनी महागलं; अजून किती भाव वाढणार? सध्याची किंमत काय?

अवघ्या ३६ दिवसांत सोनं ७,४०० रुपयांनी महागलं; अजून किती भाव वाढणार? सध्याची किंमत काय?

Gold Price : अवघ्या ३६ दिवसांत सोन्याची किंमत १० टक्के वाढली आहे. म्हणजेच सोन्याच्या दरात ७,४०० रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याची किंमत अजून किती वाढणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 14:12 IST2025-02-06T14:10:34+5:302025-02-06T14:12:02+5:30

Gold Price : अवघ्या ३६ दिवसांत सोन्याची किंमत १० टक्के वाढली आहे. म्हणजेच सोन्याच्या दरात ७,४०० रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याची किंमत अजून किती वाढणार?

gold has become expensive by rs 7400 in 36 days | अवघ्या ३६ दिवसांत सोनं ७,४०० रुपयांनी महागलं; अजून किती भाव वाढणार? सध्याची किंमत काय?

अवघ्या ३६ दिवसांत सोनं ७,४०० रुपयांनी महागलं; अजून किती भाव वाढणार? सध्याची किंमत काय?

Gold Price : मोदी सरकारने अर्थसंकल्पात सोने आणि चांदीवरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे सोने स्वस्त होईल अशी सर्वांना अपेक्षा होती. प्रत्यक्षात सोन्याचा भाव रेकॉर्ड मोडत आहे. जानेवारी महिन्यात सोन्याच्या किमतीत ६ टक्क्यांहून अधिक वाढ झाली होती. तर फेब्रुवारी महिन्यात पहिल्या आठवड्यातच सोन्याच्या किमती ३ टक्क्यांनी वाढल्या. चालू वर्षात सोने सुमारे १० टक्क्यांनी म्हणजेच ७,४०० रुपयांनी महागले आहे. ही वाढ अशीच सुरू राहिली तर मौल्यवान धातू १ लाख रुपयांची पातळी कधी ओलांडेल. वास्तविक, सोन्याच्या किमती का वाढताहेत? ही वाढ कुठपर्यंत जाईल? सरकारच्या घोषणेनंतर सोने स्वस्त होईल का? अशा तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ.

सोन्याचा शेअर मार्केटपेक्षा जास्त परतावा
चालू आर्थिक वर्षाबद्दल बोलायचे झाले तर सोने सुमारे १७ हजार रुपये प्रति दहा ग्रॅमने महागले आहे. ही वाढ अशीच चालू राहिली तर सोन्याचा भाव ८६,५०० रुपयांच्या पुढे जाऊ शकतो. याचा अर्थ २०२५ च्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस सोने गुंतवणूकदारांना २८ टक्क्यांपर्यंत परतावा देत असल्याचे दिसून येईल. म्हणजे शेअर मार्केट पेक्षाही जास्त परतावा सध्या सोने देत असल्याचे दिसत आहे.

अवघ्या ३६ दिवसांत ७,४०० रुपयांनी वाढ
देशातील फ्युचर्स मार्केट मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याचा भाव ७,४०० रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे. आकडेवारीनुसार, कॅलेंडर वर्ष २०२४ च्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी सोन्याचा भाव ७७,४५६ रुपये प्रति दहा ग्रॅम होता. जो ५ जानेवारी २०२५ रोजी ८४,८९४ रुपये प्रति दहा ग्रॅम उच्चांकावर पोहोचला आहे. ३६ दिवसांत सोन्याच्या किमतीत सुमारे १० टक्के वाढ झाली आहे.

सोन्याची किंमत अजून किती वाढू शकते?
चालू आर्थिक वर्षातही सोन्याचा भाव वाढणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ८५ हजार रुपयांची पातळी ओलांडल्यानंतर सोन्याच्या गुंतवणूकदारांमध्ये प्रॉफिट बुकींग वरचढ ठरू शकते. अशावेळी भाव घसरुन ८२ ते ८३ हजार रुपयांपर्यंत येऊ शकतात. तर काही तज्ज्ञांच्या मते चालू आर्थिक वर्षात सोन्याची किंमत ८६,५०० रुपये प्रति दहा ग्रॅमपर्यंत पोहोचू शकते. एका मोठ्या बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सोन्याची किंमत वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. अशा परिस्थितीत येत्या दोन महिन्यांत सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.

सध्याची सोन्याची किंमत काय?
आज ६ फेब्रुवारी रोजी सोन्याचे भाव स्थिर राहिले. दुपारी सोन्याचा भाव ८४,५३३ रुपयांवर आहे. तर आज सकाळी भाव ८४,७०० रुपयांवर पोहोचला होता. मात्र, सकाळी सोन्याचा दर ८४,४६० रुपये प्रति १० ग्रॅम होता.
 

Web Title: gold has become expensive by rs 7400 in 36 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.