Gold Price Today: सोने आणि चांदीच्या किमतीत आज मोठी तेजी पाहायला मिळाली आहे. गुरुवारच्या तुलनेत चांदीचा दर ६ हजार रुपयांनी वाढला आहे. 'इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन'नं (IBJA) नवीन किमती जाहीर केल्या आहेत. शुक्रवार ते रविवार सुट्टी असल्यामुळे IBJA नं नवीन दर जारी केले नव्हते, मात्र आज किमतीत वाढ नोंदवण्यात आली आहे.
सोन्याच्या किमतीत २३८४ रुपयांची वाढ
गुरुवारच्या तुलनेत आज २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम २३८४ रुपयांनी वाढला आहे. IBJA नुसार, २४ कॅरेट सोन्याचा भाव १,४७,८९१ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचलाय. यापूर्वी गुरुवारी सोन्याचा भाव १,४५,५०७ रुपये प्रति १० ग्रॅम इतका होता.
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
२३ ते १४ कॅरेट सोन्याचे आजचे दर
बुलियन मार्केटमध्ये विविध कॅरेटच्या सोन्याचे आजचे दर खालीलप्रमाणे आहेत:
२३ कॅरेट गोल्ड: १,४७,२९९ रुपये प्रति १० ग्रॅम.२२ कॅरेट गोल्ड: १,३५,४६८ रुपये प्रति १० ग्रॅम.१८ कॅरेट गोल्ड: १,१०,९१८ रुपये प्रति १० ग्रॅम.१४ कॅरेट गोल्ड: ८६,५१६ रुपये प्रति १० ग्रॅम.
चांदीच्या किमतीत ६३६८ रुपयांची उसळी
सोन्याप्रमाणेच चांदीच्या किमतीतही आज मोठी वाढ झाली आहे. चांदीचा दर आता २,३१,०२८ रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. गुरुवारी हा दर २,२४,६६० रुपये प्रति किलो होता. म्हणजेच गुरुवारच्या तुलनेत आज चांदीच्या किमतीत ६,३६८ रुपयांची तेजी नोंदवण्यात आली.
१ एप्रिलच्या तुलनेत आजही दर स्वस्त
या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच १ एप्रिल रोजी सोन्याचा भाव १,४९,५६९ रुपये प्रति १० ग्रॅम होता, तर चांदी २,३९,४८३ रुपये प्रति किलो दराने विकली जात होती. १ एप्रिलच्या तुलनेत विचार केला तर आजही सोनं १,६७८ रुपयांनी स्वस्त आहे, तर चांदी ८,४५५ रुपयांनी स्वस्त मिळत आहे.
दरातील अस्थिरतेची कारणं
युद्धामुळे सध्या जगभरात अनिश्चिततेचे वातावरण आहे. गुंतवणूकदार सध्या सोने आणि चांदीऐवजी डॉलरला अधिक पसंती देत आहेत, ज्यामुळे विक्रमी उच्चांकाच्या तुलनेत सोन्याच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली होती. याशिवाय, गुंतवणूकदारांनी केलेल्या नफावसुलीमुळे सोन्याचे दर खाली आलेत.
Web Summary : Gold and silver prices soared today. Gold jumped ₹2,384 per 10 grams, reaching ₹1,47,891. Silver spiked ₹6,368 per kg to ₹2,31,028. Despite the rise, prices remain lower than April 1st rates due to global uncertainties.
Web Summary : आज सोना और चांदी की कीमतों में तेजी आई। सोना 2,384 रुपये प्रति 10 ग्राम बढ़कर 1,47,891 रुपये पर पहुंचा। चांदी 6,368 रुपये प्रति किलो बढ़कर 2,31,028 रुपये हो गई। वैश्विक अनिश्चितताओं के कारण कीमतें 1 अप्रैल की दरों से अभी भी कम हैं।