EPFO Investment : नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी निवृत्तीनंतरचे आयुष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असणे अत्यंत महत्त्वाचे असते. यासाठी नियमित बचत हाच एकमेव मार्ग आहे. सरकारी योजना असलेल्या 'भविष्य निर्वाह निधी'कडे अनेकजण केवळ एक वजावट म्हणून पाहतात. परंतु, जर योग्य नियोजनाने ही गुंतवणूक सुरू राहिली, तर ५० हजार रुपये पगार असणारी व्यक्तीही ५.५ कोटी रुपयांहून अधिकचा फंड जमा करू शकते.
खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा आधारकेंद्र सरकारची संस्था असलेली 'कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना' पगारदार वर्गासाठी पीएफ योजना चालवते. तुमच्या मूळ पगाराच्या १२ टक्के रक्कम दरमहा कापली जाते आणि तितकीच रक्कम कंपनीकडूनही तुमच्या पीएफ खात्यात जमा केली जाते. म्हणजेच एकूण २४ टक्के रक्कम दरमहा गुंतवली जाते. सध्या पीएफवर वार्षिक ८.२५ टक्के दराने व्याज मिळत आहे.
५.५ कोटींचा फंड कसा तयार होईल?समजा, एका व्यक्तीने वयाच्या २२ व्या वर्षी नोकरी सुरू केली आणि तिचा पगार ५०,००० रुपये आहे. दरवर्षी पगारात किमान ६ टक्के वाढ होते, असे गृहीत धरल्यास ३८ वर्षांच्या कालावधीत खालीलप्रमाणे फंड तयार होऊ शकतो.
- मासिक गुंतवणूक : कर्मचारी आणि कंपनीचा हिस्सा मिळून दरमहा सुमारे २४,००० रुपये (पगार वाढीनुसार यात वाढ होईल).
- गुंतवणूक कालावधी : ३८ वर्षे (वय २२ ते ६० पर्यंत).
- एकूण जमा मुद्दल : सुमारे १.३६ कोटी रुपये.
- चक्रवाढ व्याज (८.२५% दराने) : अंदाजे ४.२० कोटी रुपये.
- एकूण मॅच्युरिटी रक्कम : सुमारे ५.५६ कोटी रुपये.
वाचा - सेन्सेक्समधील ६ कंपन्यांचे ३ लाख कोटी स्वाहा! टाटा समुहातील मौल्यवान कंपनीला सर्वाधिक फटका
चक्रवाढ व्याजाची किमयापीएफमधील गुंतवणुकीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे 'चक्रवाढ व्याज'. जसा जसा गुंतवणुकीचा कालावधी वाढतो, तशी व्याजाची रक्कम मुद्दलापेक्षाही मोठी होत जाते. वरील उदाहरणात, तुमची मुद्दल १.३६ कोटी आहे, पण त्यावर मिळालेले व्याज तब्बल ४.२० कोटी आहे. यालाच 'कंपाउंडिंग पॉवर' म्हणतात.
Web Summary : Invest regularly in your PF for a secure retirement. With a ₹50,000 salary and consistent contributions, you can accumulate over ₹5.5 crore in 38 years, thanks to compounding interest. Start early to maximize returns.
Web Summary : पीएफ में नियमित निवेश से सुरक्षित सेवानिवृत्ति सुनिश्चित करें। ₹50,000 वेतन और निरंतर योगदान के साथ, चक्रवृद्धि ब्याज के कारण 38 वर्षों में ₹5.5 करोड़ से अधिक जमा कर सकते हैं। जल्दी शुरुआत करें और लाभ उठाएं।