Join us
Daily Top 2Weekly Top 5

Elon Musk Net Worth: इलॉन मस्क यांना झटका; इकडे ब्लू-टिक हटवलं, तिकडे 13 अब्ज डॉलर्स बुडाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 19:39 IST

स्टारशिप ब्लास्ट, टेस्ला शेअर आणि ट्विटर ब्लू-टिक; गेल्या 24 तासांपासून मस्क यांना मोठे धक्के बसले आहेत.

Elon Musk Net Worth: ट्विटर युजर्सना आज मोठा झटका बसला. सीईओ इलॉन मस्क(Elon Musk) यांनी आधीच सांगितल्यानुसार, पैसे न भरलेल्या युजर्सचे ब्लू-टीक काढण्यात आले. यामुळे मस्क यांना मोठा झटका बसला आहे. ब्लू-टिकचा निर्णय, टेस्लाचे निराशाजनक त्रैमासिक निकाल, SpaceX च्या Starship कार्यक्रमाचे अपयश अशा घटनांमुळे गेल्या 24 तासांत मस्क यांच्या संपत्तीत सूमारे $13 अब्ज घट झाली आहे.

इलॉन मस्क यांच्या संपत्तीवर टेस्लाच्या शेअरमुळे सर्वाधिक परिणाम झाला आहे. टेस्लाने पहिल्या तिमाहीतील निकालांसह गुंतवणूकदारांची निराशा केली , त्यामुळे गुरुवारी त्यांच्या शेअरची किंमत 9.75% घसरून $162.99 वर आली. याशिवाय, काल स्पेसएक्सचे स्टारशिप रॉकेट लॉन्च झाल्यानंतर ब्लास्ट झाले. यासोबतच, ट्विटर युजर्सची ब्लू-टिक काढून टाकण्यात आले. या सर्वांचा त्यांच्या संपत्तीवर मोठा परिणाम झाला आहे.

ब्लू टिकबाबत स्पष्ट हेतू ट्विटर ब्लू टिकच्या संदर्भात मस्क यांनी काही आठवड्यांपूर्वी कंपनीचा हेतू स्पष्ट केला होता. त्यानुसार, आता युजर्सना ब्लू-टिकसाठी दरमहा $8 द्यावे लागतील. ज्या यूजरने पैसे भरले नाही, त्यांना ब्लू टिक मिळणार नाही. ही ब्लू-टिक काढण्याची प्रोसेस 20 एप्रिलपासून सुरू झाली आहे. याबाबत सोशल मीडियावर युजर्स नाराजीही व्यक्त करत आहेत.

टॅग्स :एलन रीव्ह मस्कट्विटरटेस्ला