Digital Gold Investment : गेल्या काही वर्षांत डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करण्याची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि फिनटेक ॲप्सने ही प्रक्रिया इतकी सोपी केली आहे की, कोणीही घरबसल्या आपल्या मोबाईलवरून सोन्याची खरेदी करू शकतो. भारतीय गुंतवणूकदारांची पहिली पसंती सोने असल्याने, अनेकांना ही सुविधा आकर्षक वाटते. पण, प्रत्येक चमकणारी वस्तू सोने नसते, हे सर्वांना माहीत आहे. त्याचप्रमाणे, डिजिटल गोल्डमध्येही असे अनेक जोखीम दडलेले आहेत, ज्याकडे दुर्लक्ष केल्यास गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होऊ शकते.
काय आहे डिजिटल गोल्ड?डिजिटल गोल्ड ही एक अशी योजना आहे, जिथे तुम्ही पैसे देऊन व्हर्चुअली सोने खरेदी करता. हे प्लॅटफॉर्म दावा करतात की, तुमच्या खरेदीच्या प्रमाणात तेवढ्याच वजनाचे फिजिकल गोल्ड त्यांच्या व्हॉल्टमध्ये सुरक्षित ठेवलेले आहे. गुंतवणूकदार हे पैसे काढण्याऐवजी फिजिकल सोन्याची डिलिव्हरी देखील घेऊ शकतात.यामध्ये १ रुपये किंवा त्याहून कमी रकमेपासून गुंतवणूक सुरू करता येत असल्याने, अनेक लोक याला लहान गुंतवणुकीचा सोपा मार्ग मानतात. पण, हा प्रश्न उपस्थित होतो की, ही गुंतवणूक खरोखरच सांगितली जाते तितकी सुरक्षित आहे का?
पैसे बुडण्याची भीती आणि नियंत्रणाचा अभावडिजिटल गोल्डमधील सर्वात मोठा धोका म्हणजे, या गुंतवणुकीचे कोणत्याही सरकारी नियामक संस्थेद्वारे नियंत्रण केले जात नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सारख्या संस्था डिजिटल गोल्डचे नियमन करत नाहीत. जर एखाद्या प्लॅटफॉर्मने अचानक दुसऱ्या दिवशी आपला व्यवसाय बंद केला किंवा ते ॲप कोणत्याही कारणास्तव बंद झाले, तर गुंतवणूकदारांचे पैसे बुडू शकतात. कारण, या गुंतवणुकीला कोणतीही शासकीय हमी नसते.
छुपे शुल्क नफ्यावर परिणामडिजिटल गोल्डमध्ये लपलेले विविध शुल्क गुंतवणूकदारांच्या वास्तविक परताव्यावर थेट परिणाम करतात. अनेक प्लॅटफॉर्म स्टोरेज, विमा आणि सोन्याच्या शुद्धतेची तपासणी या नावाखाली विविध शुल्क आकारतात. ही माहिती सहसा बारीक अक्षरात दडलेली असते, ज्याकडे बहुतेक लोक लक्ष देत नाहीत. खरेदी-विक्रीच्या वेळी वास्तविक नफा अपेक्षेपेक्षा खूपच कमी मिळतो.
डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी या सर्व जोखमींचा आणि शुल्कांचा काळजीपूर्वक अभ्यास करणे आवश्यक आहे.
Web Summary : Digital gold investments are rising, but lack regulation, posing risks. Hidden fees impact returns. Understand risks before investing to avoid potential losses, as no government guarantees exist for digital gold.
Web Summary : डिजिटल गोल्ड निवेश बढ़ रहा है, लेकिन विनियमन की कमी से जोखिम है। छिपे हुए शुल्क रिटर्न पर असर डालते हैं। निवेश से पहले जोखिमों को समझें, क्योंकि डिजिटल गोल्ड के लिए कोई सरकारी गारंटी नहीं है।