Join us

सोने सांभाळण्याची भीती वाटते? ऑनलाईन पर्यायातून मिळेल जास्त नफा, कशी करायची गुंतवणूक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 10:36 IST

Digital Gold : अस्थिर बाजारपेठेच्या परिस्थितीत सोने सुरक्षिततेची भावना प्रदान करते. जगभरात सोन्याचे रूपांतर रोख किंवा इतर मालमत्तेत जलद आणि सहजपणे करता येते.

Digital Gold : भारतीय परंपरेत सोन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याकडे फक्त दागिने म्हणून पाहिलं जात नाही, तर सोनं हे गुंतवणुकीचा सुरक्षित आणि चांगला पर्याय मानला जातो. विशेषतः महागाई आणि बाजारातील चढ-उतारांच्या काळात. पण आता सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष सोनं खरेदी करण्याची गरज नाही. आजच्या डिजिटल युगात तुम्ही ऑनलाइन म्हणजेच डिजिटल सोन्यात गुंतवणूक करू शकता. हे सोपं, सुरक्षित आणि खूप सोयीस्कर आहे.

सोन्यात गुंतवणूक का फायदेशीर आहे?सोन्यात गुंतवणूक करणं तुमच्या पोर्टफोलिओला विविधता देतं आणि संतुलन राखायला मदत करतं. शेअर बाजारात घसरण झाली की, सोन्याचे भाव वाढतात, ज्यामुळे तुमचं नुकसान भरून निघू शकतं. याशिवाय, सोन्याने महागाईविरुद्ध प्रभावीपणे संरक्षण दिलं आहे, म्हणजे राहणीमानाच्या खर्चासोबत सोन्याचं मूल्यही वाढत जातं.

आर्थिक अनिश्चितता किंवा जागतिक तणावाच्या काळात अनेक गुंतवणूकदार सोन्याकडे वळतात. सोनं तुम्हाला अशा वेळी सुरक्षिततेची भावना देतं. सोन्याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते जगात कुठेही, कधीही रोख रकमेत किंवा इतर मालमत्तेत सहजपणे रूपांतरित करता येतं. यामुळे तुम्हाला गरज पडल्यास लगेच पैसे उपलब्ध होऊ शकतात.

सोन्यातील कमोडिटी ट्रेडिंग काय आहे?कमोडिटी ट्रेडिंग म्हणजे शेअरप्रमाणे थेट सोनं खरेदी-विक्री करणं नव्हे. तर, तुम्ही एक्सचेंजद्वारे सोन्याचे फ्युचर्स आणि ऑप्शन्समध्ये व्यवहार करता. मल्टी-कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड हे एक असं प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्ही ऑनलाइन कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्जचा व्यापार करू शकता. इथे तुम्ही सोन्याशी संबंधित करारांची खरेदी-विक्री करून नफा मिळवू शकता.

सोन्याचे फ्युचर्स: यामध्ये भविष्यातील एका ठराविक तारखेला पूर्वनिर्धारित किमतीत विशिष्ट प्रमाणात सोनं खरेदी किंवा विक्री करण्याचा करार असतो.सोन्याचे ऑप्शन्स: यात तुम्हाला कराराची मुदत संपण्यापूर्वी किंवा नंतर एका ठराविक किमतीत सोनं खरेदी किंवा विक्री करण्याचा पर्याय मिळतो. फ्युचर्सपेक्षा हे कमी धोकादायक आणि जास्त लवचिक असतं.

सोन्यात ऑनलाइन गुंतवणूक कशी कराल?

  1. ब्रोकर निवडा: चांगला कमोडिटी ब्रोकर निवडून त्याच्या प्लॅटफॉर्मवर तुमचं ट्रेडिंग आणि डीमॅट अकाउंट तयार करा.
  2. एक्सचेंज निवडा: MCX सारखं एक्सचेंज निवडा.
  3. लॉट साईज ठरवा: तुमच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार आणि उपलब्ध भांडवलानुसार सोन्याच्या कमोडिटी करारासाठी लॉट साईज निवडा.
  4. मार्जिन जमा करा: ट्रेडिंग सुरू करण्यासाठी तुमच्या ब्रोकरेजमध्ये मार्जिन म्हणून काही रक्कम जमा करावी लागेल.
  5. ऑर्डर द्या: बाजारातील हालचालींवर लक्ष ठेवून आणि किमतींचा अभ्यास करून ऑर्डर द्या. तुम्हाला फ्युचर्समध्ये गुंतवणूक करायची आहे की ऑप्शन्समध्ये, हे ठरवा आणि तुमची ट्रेडिंग रणनीती काय आहे यावर अवलंबून ऑर्डर द्या.
  6. पोझिशन व्यवस्थापित करा: जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी आणि नुकसान कमी करण्यासाठी किमतीतील चढ-उतार लक्षात घेऊन तुमची बाजारपेठेतील पोझिशन व्यवस्थापित करा.

सोन्याच्या कमोडिटी ट्रेडिंगचे फायदेपोर्टफोलिओ विविधीकरण: हे तुमच्या गुंतवणुकीला लगेच विविधता देतं आणि बाजारातील जोखीम कमी करण्यास मदत करतं.जोखीम संरक्षण: चलनवाढ, बाजारातील चढ-उतार किंवा चलनातील अस्थिरता यांसारख्या जोखमींपासून तुम्ही स्वतःचं संरक्षण करू शकता.लीव्हरेज: कमी मार्जिनसह तुम्ही मोठ्या पोझिशन्स घेऊ शकता आणि जास्तीत जास्त परतावा मिळवू शकता.उच्च तरलता: सोन्याची तरलता जास्त असल्यामुळे तुम्ही बाजारात सहजपणे प्रवेश करू शकता आणि बाहेर पडू शकता.सुरक्षितता: या व्यवहारात तुम्हाला प्रत्यक्ष सोनं साठवण्याची किंवा त्याच्या सुरक्षिततेची चिंता करण्याची गरज नाही.

वाचा - नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?

हे लक्षात ठेवा की सोन्याच्या आंतरराष्ट्रीय मागणी आणि पुरवठ्याचा त्याच्या किमतींवर परिणाम होतो. जेव्हा मागणी वाढते तेव्हा सोन्याची किंमत वाढते आणि याउलटही होतं. 

टॅग्स :सोनंगुंतवणूकशेअर बाजारशेअर बाजार