Join us
Daily Top 2Weekly Top 5

PNB मध्ये ३०४ दिवसांच्या FD मध्ये ₹३,००,००० जमा करा; किती मिळेल व्याज? पटापट चेक करा कॅलक्युलेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 14:37 IST

Punjab National Bank FD Calculator: सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँक आपल्या मुदत ठेव (FD) खात्यांवर जबरदस्त व्याज देत आहे. पाहा कोणती आहे ही स्कीम आणि ३ लाखांवर किती मिळेल रिटर्न?

Punjab National Bank FD Calculator: सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँक (PNB) आपल्या मुदत ठेव (FD) खात्यांवर जबरदस्त व्याज देत आहे. ही सरकारी बँक ग्राहकांना वेगवेगळ्या कालावधीच्या एफडी योजनांवर ३.०० टक्के ते ७.४० टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. पीएनबीमध्ये तुम्ही किमान ७ दिवसांपासून ते कमाल १० वर्षांच्या कालावधीसाठी एफडी खातं उघडू शकता.

स्पेशल एफडी योजना आणि व्याजाचे दर

पंजाब नॅशनल बँक ४४४ दिवसांच्या स्पेशल एफडी योजनेवर सर्वाधिक व्याज देत आहे. या योजनेअंतर्गत सामान्य नागरिकांना ६.६० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना ७.१० टक्के आणि ८० वर्षांवरील अति-ज्येष्ठ नागरिकांना ७.४० टक्के व्याज मिळत आहे. तसंच, ३०४ दिवस ते १ वर्षापर्यंतच्या एफडीवर सामान्य नागरिकांना ५.६० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना ६.१० टक्के आणि अति-ज्येष्ठ नागरिकांना ६.४० टक्के व्याज दिलं जात आहे.

IMF च्या कुबड्यांचा वापर करुन चालणाऱ्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था संकटात; युद्धाचा जोरदार फटका, प्रकरण काय?

₹३,००,००० जमा केल्यास किती फायदा?

जर तुम्ही पीएनबीमध्ये ३०४ दिवसांच्या एफडी योजनेत ३ लाख रुपये जमा केले, तर सामान्य नागरिकांना १४,२२२ रुपयांच्या व्याजासह एकूण ३,१४,२२२ रुपये मिळतील. याच कालावधीसाठी ज्येष्ठ नागरिकांना १५,५१४ रुपयांच्या व्याजासह एकूण ३,१५,५१४ रुपये मिळतील, तर अति-ज्येष्ठ नागरिकांना १६,२९२ रुपयांच्या खात्रीशीर व्याजासह एकूण ३,१६,२९२ रुपये परत मिळतील. एफडी हा गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो, कारण यामध्ये एका निश्चित काळानंतर तुम्हाला ठरलेलं व्याज आणि संपूर्ण रक्कम परत मिळते.

English
हिंदी सारांश
Web Title : PNB FD: Invest ₹3 Lakh in 304-Day FD, Check Interest Rates!

Web Summary : Punjab National Bank offers attractive FD rates, up to 7.40%. Investing ₹3,00,000 in a 304-day FD yields ₹14,222 interest for general citizens. Senior and super senior citizens earn even higher returns, making it a safe investment option.
टॅग्स :पंजाब नॅशनल बँकगुंतवणूकपैसा