Residence in Mumbai : मुंबईत घरांच्या किमती गगनचुंबी इमारतींसारख्या वाढतच चालल्या आहेत. येथे घर घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलं आहे. आता हेच पाहा ना, एका व्यक्तीने मुंबईतील वरळी भागात एक फ्लॅट घेण्यासाठी जवळपास २ कोटी रुपयांचे फक्त मुद्रांक शुल्क (स्टँप ड्युटी) भरले आहे. मुंबईत निवासी अपार्टमेंटसाठी खूप महागडी डील झाली आहे. शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणूकदार जगदीश मास्टर यांनी १०६ कोटी रुपयांमध्ये हा करार केला आहे. मुंबईतील पॉश भागात असलेल्या या निवासी अपार्टमेंटमधून समुद्राच्या उसळणाऱ्या लाटांचे दृश्य पाहता येते.
गेल्या महिन्यात जगदीश मास्टर यांच्या पत्नी उर्जिता जगदीश मास्टर यांनीही याच अपार्टमेंटमध्ये १०५ कोटी रुपयांचा निवासी फ्लॅट खरेदी केला होता. पती-पत्नी दोघेही दीप फायनान्शियल कन्सल्टंट्स या वित्तीय सेवा कंपनीचे संचालक आहेत. इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, नवीन खरेदी केलेले अपार्टमेंट ७१३० स्क्वेअर फूटचे आहे. हे अपार्टमेंट ॲनी बेझंट रोडवर आहे.
१.९७ कोटी रुपये मुद्रांक शुल्क खरेदीदाराने १ कोटी ९७ लाख रुपये मुद्रांक शुल्कही भरले आहे. तीन वर्षांपूर्वी याच अपार्टमेंटच्या विक्रीपोटी २.८६ कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरण्यात आले होते. नवीन खरेदीदाराने डिफरेन्शियल मुद्रांक शुल्क भरले आहे. सरकारी नियमांनुसार, फ्लॅटची नोंदणी झाल्यानंतर ३ वर्षांच्या आत विक्री झाल्यास, नवीन खरेदीदाराला फक्त डिफरेन्शियल मुद्रांक शुल्क भरावे लागते. म्हणजे आधीच्या नोंदणीपेक्षा आता जास्त मुद्रांक शुल्क भरावे लागत असेल, तर ते आधीच्या मुद्रांक शुल्कापेक्षा वाढलेल्या शुल्काच्या आधारेच भरावे लागेल. जेणेकरून फ्लॅटच्या वाढलेल्या किमतीची मुद्रांक शुल्क सरकारी तिजोरीत भरून निघेल.
निवासी मालमत्तांच्या किमती गगनालाइकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, देशातील निवासी मालमत्तांच्या किमती गगनाला भिडत आहेत. २०२४ मध्ये त्यात मोठी झेप घेतली आहे. २०२५ मध्ये या किमती सर्वकालीन उच्चांकावर पोहचण्याची शक्यता आहे. रिअल इस्टेट प्रॉपर्टी डीलच्या बाबतीत मुंबई आघाडीवर आहे. येथे सर्वात महागडे सौदे झाले आहेत. त्यामुळे येथील मालमत्तेच्या किमती सतत वाढत असून त्याची चर्चाही होत असते. दक्षिण आणि मध्य मुंबईत देशातील सर्वात महागडे अपार्टमेंट आहेत.