Gold Silver Price Today April 13: आज १३ एप्रिल २०२६ रोजी सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) वर बाजार उघडताच सोन्याच्या भावात १,०४० रुपये आणि चांदीच्या भावात ५,३३९ रुपयांची घसरण नोंदवण्यात आली. एकीकडे कमोडिटी बाजार कोसळताना दिसत आहे, तर दुसरीकडे डॉलर इंडेक्समध्ये मजबूती कायम आहे.
एमसीएक्सवर सोन्या-चांदीची स्थिती
देशांतर्गत कमोडिटी बाजारावर डॉलर इंडेक्समधील मजबुतीचा स्पष्ट परिणाम दिसून येत आहे. एमसीएक्सवर बाजार उघडताच सोन्याचा भाव १,५१,६५० रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा भाव २,३७,९६१ रुपये प्रति किलोवर आला. गेल्या आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्याची किंमत १,५२,६९० रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा भाव २,४३,३०० रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. दरम्यान, आंतरराष्ट्रीय कमोडिटी बाजारात सकाळी सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी वाढ पाहायला मिळाली. अमेरिका आणि इराणमधील चर्चा यशस्वी न झाल्यामुळे कमोडिटी बाजारात घसरण होत असून, हा तणाव लवकर संपला नाही तर ही घसरण पुढेही सुरू राहू शकते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
देशातील प्रमुख शहरांतील सोन्याचे दर
दिल्ली: २४ कॅरेट सोन्याची किंमत १,५२,९८० रुपये प्रति १० ग्रॅम, २२ कॅरेट १,४०,२४० रुपये आणि १८ कॅरेट १,१४,७७० रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे.
मुंबई: २४ कॅरेट सोन्याचा भाव १,५२,८३० रुपये, २२ कॅरेट १,४०,०९० रुपये आणि १८ कॅरेट सोन्याचा दर १,१४,६२० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.
चेन्नई: २४ कॅरेट सोन्याची किंमत १,५३,८१० रुपये, २२ कॅरेट १,४०,९९० रुपये आणि १८ कॅरेटचा भाव १,१७,५९० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.
कोलकाता: २४ कॅरेट सोन्याचा भाव १,५२,८३० रुपये, २२ कॅरेट १,४०,०९० रुपये आणि १८ कॅरेटचा दर १,१४,६२० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचलाय.
प्रमुख शहरांतील चांदीचे दर
दिल्ली, मुंबई आणि कोलकाता या शहरांमध्ये आज चांदीचा भाव २,५९,९०० रुपये प्रति किलो आहे. तर चेन्नईमध्ये चांदीचा दर २,६४,९०० रुपये प्रति किलो इतका नोंदवण्यात आला आहे.
Web Summary : Gold and silver prices fell sharply today, April 13, 2026. MCX saw gold drop ₹1,040 and silver ₹5,339. Domestic markets reflect dollar strength. Gold is around ₹1,51,650/10g, silver ₹2,37,961/kg. City rates vary; Delhi gold (24K) is ₹1,52,980/10g, silver ₹2,59,900/kg.
Web Summary : आज, 13 अप्रैल 2026 को सोने और चांदी की कीमतों में भारी गिरावट आई। एमसीएक्स पर सोने में ₹1,040 और चांदी में ₹5,339 की गिरावट देखी गई। घरेलू बाजार डॉलर की मजबूती को दर्शाते हैं। सोना लगभग ₹1,51,650/10 ग्राम, चांदी ₹2,37,961/किलो है। शहर के अनुसार दरें अलग-अलग हैं; दिल्ली में सोना (24K) ₹1,52,980/10 ग्राम, चांदी ₹2,59,900/किलो है।