Anil Ambani: उद्योगपती अनिल अंबानी यांच्या विविध कंपन्यांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ED)ने छापे टाकले. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या कारवाईनतंर आज(२७ जुलै) रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने एक निवेदने जारी केले आहे. दोन्ही कंपन्यांनी त्यांच्या निवेदनांमध्ये म्हटले की, रिलायन्स पॉवर लिमिटेड आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडशी संबंधित सर्व ठिकाणी ईडीची कारवाई पूर्ण झाली आहे. दोन्ही कंपन्या आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी ईडी अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य केले आहे आणि यापुढेही करत राहतील.
सध्या सुरू असलेली चौकशी रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड (आरकॉम) आणि रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड (आरएचएफएल) यांच्यातील दशकाहून अधिक जुन्या व्यवहारांशी संबंधित आहे. कंपनीच्या निवेदनानुसार, रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या दोन्ही स्वतंत्र आणि स्वतंत्रपणे सूचीबद्ध कंपन्या आहेत, ज्यांचा आरकॉम किंवा आरएचएफएलशी कोणताही व्यावसायिक किंवा आर्थिक संबंध नाही.
आरकॉम दिवाळखोरी प्रक्रियेतआरकॉम सहा वर्षांहून अधिक काळापासून कॉर्पोरेट दिवाळखोरी प्रक्रियेतून जात आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, आरएचएफएलचे सर्व प्रकरण पूर्णपणे सोडवले गेले आहेत. याशिवाय, त्यांच्याविरुद्ध केलेले काही आरोप सिक्युरिटीज अपीलीय न्यायाधिकरणाकडे प्रलंबित आहेत. दरम्यान, अनिल अंबानी हे रिलायन्स पॉवर किंवा रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या संचालक मंडळावर नाहीत. त्यामुळेच, आरकॉम किंवा आरएचएफएलशी संबंधित कोणत्याही कारवाईचा या दोन्ही कंपन्यांच्या प्रशासन, व्यवस्थापन किंवा दैनंदिन कामकाजाशी काहीही संबंध नाही.
शेअर्सवर परिणाम ईडीच्या कारवाईमुळे रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इन्फ्राच्या शेअर्सवर वाईट परिणाम झाला. आरपॉवरला गुरुवार आणि शुक्रवारी ५-५ टक्क्यांचा लोअर सर्किट लागला, तर संपूर्ण आठवड्यात सुमारे १२ टक्के घसरले. तसेच, आरइन्फ्रादेखील गेल्या आठवड्यात ११.३६ टक्क्यांनी घसरला.
(टीप-शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)