Join us

Adani House: दिल्लीत 400 कोटींचा बंगला, परेशातही आलिशाय घरे; असे आहे गौतम अदानींचे घर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 19:19 IST

Gautam Adani: सध्या गौतम अदानी यांचीच भारतात सर्वाधिक चर्चा होत आहे.

Adani Group: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या गौतम अदानी यांना आज प्रत्येकजण ओळखतो. गौतम अदानी यांनी गेल्या काही वर्षात अब्जावधींची संपत्ती कमावली, पण हिंडेनबर्ग रिपोर्टमुळे तेवढीच संपत्ती गमवली. संपत्ती अर्ध्यावर आली तरी गौतम अदानी श्रीमंतांच्या यादीत कायम आहेत. दरम्यान, अदानी यांच्या संपत्तीसह त्यांच्या घराचीही खूप चर्चा होत असते. आज आम्ही तुम्हाला गौतम अदानी यांच्या घराविषयी सांगणार आहोत.

अदानी यांचे दिल्ली-गुरुग्राममध्ये घर

गौतम अदानी यांची देश-विदेशात अनेक घरे आहेत. त्यामध्ये दिल्लीतील लुटियन्समधील करोडो रुपयांचा बंगलाही आहे. हा बंगला अतिशय आलिशान असून, राजवाड्यापेक्षा कमी नाही. या घराची किंमत सुमारे 400 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येते. अदानी यांचे दिल्लीतील हे घर खूप मोठे आहे आणि ते सुमारे 4 एकर परिसरात पसरले आहे. या बंगल्याशिवाय दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममध्येही त्यांचे घर आहे.

गुजरात आणि ऑस्ट्रेलियातही घर 

गौतम अदानी हे गुजरातचे आहेत, त्यांचा जन्म 24 जून 1962 रोजी गुजरातमध्ये झाला होता. त्यामुळे त्यांचे गुजरातमध्येही घर आहे. गौतम अदानी यांचे अहमदाबादमध्ये हे घर आहे. अहमदाबादमधील मिठाखली क्रॉसिंगजवळ नवरंगपुरा येथे गौतम अदानी यांचे घर आहे. याशिवाय गौतम अदानी यांची घरेही परदेशात आहेत. गौतम अदानी यांचा ऑस्ट्रेलियातील अॅबॉट पोर्टमध्येही आलिशान बंगला आहे.

अनेक क्षेत्रात व्यवसाय

गौतम अदानी यांचा व्यवसाय अनेक क्षेत्रात पसरलेला आहे. कोळसा, तेल, वायू, बंदरे, मल्टी-मॉडल लॉजिस्टिक्स, वीज निर्मिती, विमानचालन यांसारख्या व्यवसायांमध्ये गौतम अदानी आहेत. फोर्ब्सच्या यादीनुसार, 29 मार्च 2023 रोजी जगातील सर्वात श्रीमंत लोकांमध्ये गौतम अदानी यांचे नाव 24 व्या क्रमांकावर आहे. 

टॅग्स :गौतम अदानीअदानीसुंदर गृहनियोजनव्यवसाय