Join us

Zomato चा मोठा निर्णय, देशभरात बंद केली ही खास सेवा! अशी आहे शेअरची स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 19:13 IST

ज्या-ज्या ठिकाणी झॉमॅटो फूड डिलीव्हरी प्रोव्हाइड करते, त्या जवळपास 750-800 शहरांमध्ये हे अॅप लॉन्च करण्यात आले होते.

ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी Zomato ने आपली हायपरलोकल प्रॉडक्ट डिलिव्हरी सेवा 'Xtreme' बंद केली आहे. कंपनीने Google Play Store वरून आपले Xtreme ॲपही काढून टाकले आहे. झोमॅटोने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात ही सेवा सुरू केली होती. ज्या-ज्या ठिकाणी झॉमॅटो फूड डिलीव्हरी प्रोव्हाइड करते, अशा जवळपास 750-800 शहरांमध्ये हे अॅप लॉन्च करण्यात आले होते. यात, शॅडोफॅक्स, पोर्टर, लोडशेअरच्या माध्यमाने प्रोव्हाइड केल्या जाणाऱ्या सेवांच्या धर्तीवर छोटे इंट्रासिटी पॅकेज देण्यासाठी छोट्या आणि मोठ्या दोन्ही प्रकारच्या व्यापाऱ्यांना टार्गेट करण्यात आले होते. मात्र, मात्र आता एका वर्षाच्या आतच ही सेवा बंद होत आहे. मात्र, यासंदर्भात झोमॅटोकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही..

काय म्हणते कंपनी? -इकोनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, कंपनीच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे की, "हा एक प्रयोग होता आणि कुठल्याही दिशेने जाऊ शकत होता." महत्वाचे म्हणजे,  Xtreme एक लॉजिस्टिक्स सर्व्हिस आहे, जिच्या सहाय्याने व्यापाऱ्यांना पार्सल पाठवणे आणि मिळवता येत होते. ही सर्व्हिस केवळ इंट्रासिटी पॅकेजसाठी होती. च्याचे जास्तीत जास्त वजन 10 किलोग्रॅमपर्यंत होते. पॅकेजची शुरुवातीची किंमत ₹35 एवढी होती.

अशी आहे झोमॅटोच्या शेअरची स्थिती -यातच, झोमॅटोने आपली इंटरसिटी फूड डिलीवरी ऑफर 'लिजन्ड्स' पुन्हा एकदा लॉन्च केली आहे. तसेच, झोमॅटोच्या शेअरसंदर्भात बोलायचे झाल्यास, हा शेअर 207.30 रुपयांवर होता. हा गेल्या व्यवहाराच्या दिवसाच्या तुलनेत 0.41% ने घसरून बंद झाला आहे.

टॅग्स :झोमॅटोशेअर बाजारव्यवसाय