Join us

Zomato चा शेअर बनला रॉकेट! ७ दिवसात १८% वाढला, जाणून घ्या नेमकं कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2023 15:40 IST

झोमॅटोच्या शेअरचे लिस्टिंग २०२१ मध्ये झाली.

ऑनलाइन फूड डिलिव्हरी एग्रीगेटर झोमॅटोचा स्टॉक गेल्या सात दिवसांत १७.५ टक्क्यांनी वाढला आहे. या शेअरची किंमत सोमवारी तीन टक्क्यांच्या उसळीसह ८० रुपयांच्या पातळीवर पोहोचली. हे शेअर मागील ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर आहेत. या फूड एग्रीगेटर कंपनीचा साठा शुक्रवारी ७८ रुपयांवर बंद झाला. अशाप्रकारे कंपनीच्या शेअरची किंमत शुक्रवारी IPO जारी किंमत ७६ रुपयेच्या वर होता.

'करदाते दान कराहेत, भारतात टॅक्स शिक्षा आहे', टॅक्स सिस्टीमवर अशनीर ग्रोव्हर स्पष्ट बोलला...

गुरुग्राम बेस्ड कंपनीची लिस्टिंग २०२१ मध्ये झाली होती. आयपीओसाठी कंपनीने ७२ -७६ रुपये प्रति शेअर प्राइज ठेवली होती. यानंतर कंपनीचे शेअर जबरदस्त प्रीमियमसह १२५ रुपयांच्या स्तरावर लिस्ट झाला होता. 

Zomato ने १९ मे रोजी चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. तेव्हापासून आत्तापर्यंत या समभागात २६% वाढ झाली आहे. कंपनीने क्विक कॉमर्स व्यवसाय वगळून आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या चौथ्या तिमाहीत EBITDA सकारात्मक नोंदवला होता.

चौथ्या तिमाहीत कंपनीचा तोटा १८८ कोटी रुपयांवर आला, जो एका वर्षापूर्वी याच तिमाहीत ३६० कोटी रुपये होता. वार्षिक आधारावर कंपनीच्या एकत्रित महसुलात ७० टक्के वाढ झाली आहे.

चौथ्या तिमाहीच्या निकालांनंतर, कोटक इक्विटीजने झोमॅटोवर BUY रेटिंग दिले आहे आणि लक्ष्य किंमत  ८२ रुपयांच्या आधीच्या लक्ष्यापासून ९५ रुपये केली आहे.

सध्या हा शेअर १.८७ टक्क्यांच्या वाढीसह ७९.०५ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होता. गेल्या एका महिन्यात स्टॉक २६.२० टक्क्यांनी वधारला आहे. गेल्या सहा महिन्यांत या शेअरमध्ये २२.६७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तो यावर्षी आतापर्यंत ३१.०१ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

टॅग्स :झोमॅटोशेअर बाजार