Join us

Zomato वरील विघ्न काही जाईना, Uber नं घेतला निर्णय आणि शेअर्स झाले धडाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 11:08 IST

Stock Market Zomato Shares : शेअर बाजाराच्या कामकाजाच्या सुरूवातीच्या सत्रात झोमॅटोच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली.

Stock Market Zomato Shares : झोमॅटोवरील विघ्न अद्यापही जाण्याचं नाव घेत नाहीये. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं पडणारे झोमॅटोच्या शेअर्सच्या किंमतीत थोडी वाढ दिसू लागली होती. परंतु आता एका वृत्तामुळे पुन्हा एकदा झोमॅटोचे शेअर्स बुधवारी सकाळी आपटले. आज कामकाजाच्या सुरूवातीच्या सत्रात झोमॅटोच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. कामकाजाच्या सुरूवातीच्या सत्रात झोमॅटोचे शेअर्स जवळपास २ टक्क्यांपर्यंत घसरून ५४.४५ रूपयांवर आले होते.

उबर टेक्नॉलॉजीज झोमॅटोमधील आपला ७.८ टक्के हिस्सा विकणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. फूड टेक कंपनीतील सर्वात मोठा शेअर्सहोल्डर उबर टेक्नॉलॉजीज जवळपास ६१ कोटी शेअस विकणार आहे. मंगळवारी झोमॅटोच्या शेअर्समध्ये २० टक्क्यांची वाढ होऊन ते ५५.६० रूपयांवर बंद झाले होते. त्यानंतर कंपनीच्या शेअर्सनं आज अपर सर्किटही हीट केलं होतं.

झोमॅटोचे शेअरधारक ब्लॉक डीलच्या माध्यमातून ३७३ मिलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास २९३८ कोटी रूपये जमवण्याची शक्यता असल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. ब्लॉक डीलसाठी ४८ ते ५४ रूपये प्रति शेअर किंमत निश्चित करण्यात आली आहे.

टॅग्स :झोमॅटोव्यवसायशेअर बाजार