Zomato Share Price Target : फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोच्या शेअर्समध्ये गुरुवारी प्रचंड तेजी आली. झोमॅटोचा शेअर गुरुवारी बीएसईवर ५ टक्क्यांहून अधिक वधारून २६१.७५ रुपयांवर पोहोचला. झोमॅटोच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ होऊ शकते, असं बाजार तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कंपनीच्या शेअर्सना पहिल्यांदाच ४०० रुपयांचे टार्गेट मिळालंय. परदेशी ब्रोकरेज हाऊस सीएलएसएने झोमॅटोच्या शेअर्सचा समावेश आपल्या 'हाय कन्व्हिक्शन आउटपरफॉर्म' लिस्टमध्ये केला आहे. झोमॅटोचा शेअर ५२ आठवड्यांतील उच्चांकी ३०४.५० रुपयांवर पोहोचला होता.
दिलंय आउटपरफॉर्म रेटिंग
ब्रोकरेज हाऊस सीएलएसएनं झोमॅटोच्या शेअर्सवर आउटपरफॉर्म रेटिंग कायम ठेवलंय. सीएलएसएनं झोमॅटोच्या शेअर्सचं टार्गेट ४०० रुपयांपर्यंत वाढवलंय. ब्रोकरेज हाऊसनं यापूर्वी कंपनीच्या समभागांसाठी ३७० रुपयांचं टार्गेट ठेवलं होतं. झोमॅटोच्या शेअरला पहिल्यांदाच ४०० रुपयांचे टार्गेट मिळालंय. ब्रोकरेज हाऊसनं एका नोटमध्ये झोमॅटोच्या शेअरच्या किंमतीत नुकत्याच झालेल्या करेक्शनमुळे शेअरमध्ये एन्ट्री करण्याची चांगली संधी मिळाली असल्याचं म्हटलंय. झोमॅटोचा शेअर ३०४ रुपयांच्या उच्चांकी पातळीवरून २५ टक्क्यांहून अधिक घसरलाय.
४०० टक्क्यांहून अधिक तेजी
फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोच्या शेअरमध्ये गेल्या २ वर्षात ४०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. झोमॅटोचा शेअर २० जानेवारी २०२३ रोजी ५१.५० रुपयांवर व्यवहार करत होता. कंपनीचा शेअर १६ जानेवारी २०२५ रोजी २६१.७५ रुपयांवर पोहोचलाय. गेल्या वर्षभरात झोमॅटोच्या शेअरमध्ये ९० टक्क्यांहून अधिक वाढ झाली. १६ जानेवारी २०२४ रोजी कंपनीचा शेअर १३३.५५ रुपयांवर होता. १६ जानेवारी २०२५ रोजी कंपनीचा शेअर २६० रुपयांच्या वर गेला होता. कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर ३०४.५० रुपये आहे. तर, शेअरचा ५२ आठवड्यांतील नीचांकी स्तर १२१.७० रुपये आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूकर करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)