Join us
Daily Top 2Weekly Top 5

झोमॅटो दरमहा २ लाख लोकांना रोजगार देते, तर तवेढच लोक नोकरीही सोडतात; गोयल यांनी सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 13:55 IST

Gig Workers : आजकाल मोठ्या शहरांमध्ये गिग कामगार सामान्य होत चालले आहेत. झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल यांनी यामागचं जळजळीत वास्तव्य सांगितले आहेत.

Zomato Gig Workers :ऑनलाइन फूड डिलिव्हरी क्षेत्रातील आघाडीची कंपनी 'झोमॅटो' दरमहा सुमारे ५,००० डिलिव्हरी पार्टनर्सना कामावरून काढून टाकते. कंपनीच्या शिस्तबद्ध कार्यपद्धतीमध्ये बसत नसलेल्या आणि वारंवार फसवणूक करणाऱ्या वर्कर्सवर ही कारवाई केली जाते, अशी खळबळजनक कबुली खुद्द झोमॅटोचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपिंदर गोयल यांनी दिली आहे. एका प्रसिद्ध पॉडकास्टमध्ये बोलताना त्यांनी 'गिग इकॉनॉमी'मधील कामाचे स्वरूप आणि आव्हाने स्पष्ट केली.

नोकरी सोडण्याचे आणि भरतीचे 'महाचक्र'गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ कंपनीच लोकांना काढते असे नाही, तर दरमहा सुमारे १.५ लाख ते २ लाख डिलिव्हरी पार्टनर्स स्वतःहून नोकरी सोडतात. हे नुकसान भरून काढण्यासाठी कंपनीला दरमहा तितक्याच नव्या लोकांची भरती करावी लागते.

लोक नोकरी का सोडतात?गोयल यांच्या मते, अनेकांसाठी ही नोकरी कायमस्वरूपी नसून ती केवळ एक 'ट्रान्झिशन जॉब' (एका कामावरून दुसऱ्या कामावर जाण्यामधील तात्पुरता पर्याय) आहे. काही लोक तातडीच्या पैशांची गरज भागवण्यासाठी काही दिवस काम करतात आणि गरज संपली की काम सोडून देतात.

'या' कारणांमुळे होते हकालपट्टीडिलिव्हरी पार्टनर्सना कामावरून काढण्यामागे प्रामुख्याने फसवणूक हे मोठे कारण असल्याचे गोयल यांनी सांगितले. अनेकदा डिलिव्हरी न करताच अॅपवर 'डिलिव्हर्ड' असा मार्क केला जातो. कॅश-ऑन-डिलिव्हरी ऑर्डर्समध्ये ग्राहकांना उरलेले पैसे परत करण्याचे आश्वासन दिले जाते, पण ते प्रत्यक्षात दिले जात नाहीत.

काय आहे 'कर्मा स्कोअर'चे गणित?कंपनीमध्ये 'कस्टमर कर्मा स्कोअर' आणि 'रायडर कर्मा स्कोअर' अशी एक अंतर्गत यंत्रणा राबवली जाते. जर एखाद्या ग्राहकाचा रेकॉर्ड (स्कोअर) चांगला असेल, तर तक्रार आल्यावर कंपनी ग्राहकाच्या बाजूने विचार करते. मात्र, अनेकदा खरे काय घडले हे शोधणे कठीण असते. अशा वादात ५०% ते ७०% वेळा कंपनीला आर्थिक नुकसान सोसावे लागते, असेही गोयल यांनी नमूद केले.

AI चा वापर करून ग्राहकांकडूनही फसवणूककेवळ डिलिव्हरी बॉईजच नाही, तर ग्राहकही कंपनीला चुना लावण्यात मागे नसल्याचे गोयल यांनी सांगितले. काही ग्राहक जेवणात स्वतःचे केस टाकून रिफंड मागतात. धक्कादायक म्हणजे, आता अनेक ग्राहक आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून अन्नाचे खराब किंवा डॅमेज फोटो तयार करतात आणि रेस्टॉरंटवर खोटा आरोप करून पैसे वसूल करतात. अशा प्रवृत्तींना रोखणे हे कंपनीसमोर मोठे आव्हान आहे.

वाचा - २०२६ मध्ये सोने-चांदी नाही तर 'या' क्षेत्रातील शेअर्स देणार बंपर परतावा; अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष

'ब्लिंकिट'ची झेपव्यवसायाचा विचार करता, गेल्या तिमाहीत झोमॅटोच्या क्विक कॉमर्स युनिट 'ब्लिंकिट'ने फूड डिलिव्हरी व्यवसायाला मागे टाकले आहे. जरी झोमॅटोचा मूळ फूड बिझनेस सर्वाधिक नफा कमावून देत असला, तरी वाढीच्या वेगात ब्लिंकिट आघाडीवर आहे. याशिवाय कंपनी 'डिस्ट्रिक्ट' (इव्हेंट आणि आऊटिंग) आणि 'हायपरप्युअर' (B2B सप्लाय) या क्षेत्रांतही पाय पसरत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Zomato: High hiring, firing rates, and fraud revealed by Goyal.

Web Summary : Zomato hires and loses lakhs of delivery partners monthly, CEO Goyal revealed. Fraudulent practices lead to dismissals. Many treat the job as temporary. Customers also exploit the system using AI.
टॅग्स :झोमॅटोअन्नऑनलाइन