Arattai App : तुम्ही जर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म WhatsApp सारखे देशी App शोधत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या 'आत्मनिर्भर भारत' अभियानाला बळ देत, भारतीय सॉफ्टवेअर कंपनी झोहो (Zoho) ने आपले नवीन मेसेजिंग अॅप 'अरट्टई' (Arattai) बाजारात आणले आहे. हे मेसेजिंग अॅप कमी इंटरनेट असलेल्या ठिकाणी आणि स्वस्त स्मार्टफोनवरही सहजपणे काम करेल, असा दावा कंपनीने केला आहे. चेन्नईस्थित झोहो कॉर्पोरेशनने विकसित केलेले हे ॲप, रिमोट आणि ग्रामीण भागातील लोकांसाठी विशेषतः फायदेशीर ठरणार आहे.
कंपनीचा दावा आहे की, येत्या काळात 'अरट्टई' व्हॉट्सअॅपला टक्कर देईल.भारतात ॲप स्टोअरवर नंबर १गेल्या काही दिवसांपासून 'अरट्टई' अॅप चर्चेत आहे. अल्पावधीतच याची लोकप्रियता इतकी वाढली आहे की, ते भारतातील अॅप स्टोअरवर नंबर १ सोशल नेटवर्किंग ॲप बनले आहे.हे अॅप पूर्णपणे 'मेड इन इंडिया' आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 'X' (पूर्वीचे ट्विटर) सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याचे कौतुक करताना म्हटले आहे की, "अरट्टई हे इंस्टंट मेसेजिंग अॅप मोफत, वापरण्यास सोपे, सुरक्षित आणि 'मेड इन इंडिया' आहे. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या 'स्वदेशी' वापराच्या आवाहनाने प्रेरित होऊन मी सर्वांना मित्र आणि कुटुंबासोबत जोडले राहण्यासाठी भारतात बनवलेले अॅप्स वापरण्याचे आवाहन करतो."
'अरट्टई' म्हणजे काय? आणि त्याचे खास फीचर्स
- 'अरट्टई' हा शब्द तमिळ भाषेतील आहे, ज्याचा अर्थ 'चॅट करणे' किंवा 'गप्पा मारणे' असा होतो. झोहोने बनवलेले हे अॅप फिचर्सनी परिपूर्ण असून, सुरक्षिततेच्या बाबतीत कोणत्याही विदेशी अॅपइतकेच उच्च दर्जाचे आहे.
- कमी डेटा वापर: 'अरट्टई' लो बँडविड्थ ऑप्टिमायझेशनवर काम करते. यामुळे कमी इंटरनेट डेटा वापरला जातो आणि इंटरनेटचा वेग कमी असतानाही हे अॅप चांगल्या प्रकारे काम करते. डोंगर किंवा गावांसारख्या दुर्गम भागातही त्याचा सहज वापर करता येईल.
- कमी मेमरी वापर: हे अॅप फोनची कमी मेमरी वापरते, ज्यामुळे बॅटरीवरही कमी भार पडतो. त्यामुळे जुन्या किंवा कमी कॉन्फिगरेशनच्या स्मार्टफोनवरही हे अॅप क्रॅश न होता व्यवस्थित चालते.
- फिचर्स: टेक्स्ट आणि व्हॉईस मेसेजिंग, ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल, ग्रुप चॅट, फोटो-व्हिडिओ-डॉक्युमेंट शेअरिंग, चॅनल, मीटिंग शेड्यूल करणे, स्टोरीज आणि लोकेशन शेअरिंग यांसारखी सर्व आधुनिक फीचर्स यात आहेत. हे ॲप लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही सहज वापरू शकते.
- सुरक्षितता आणि प्रायव्हसी: झोहोचा दावा आहे की, यात सुरक्षा आणि प्रायव्हसीची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे.
वाचा - सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
'अरट्टई' ॲप कसे डाउनलोड कराल?
- 'अरट्टई' ॲप डाउनलोड करण्यासाठी खालील सोप्या स्टेप्स फॉलो करा
- Apple च्या ॲप स्टोअर किंवा Google Play Store वर जा.
- 'Arattai' ॲप शोधा आणि ते डाउनलोड करा.
- त्यानंतर, तुमचा फोन नंबर वापरून तुमचे अकाउंट तयार करा.
- तुमचे नाव, डिस्प्ले पिक्चर, बायो आणि एक युझरनेम टाकून प्रोफाइल सेट करा.
- हे युझरनेम मित्रांसोबत शेअर करून त्यांना कनेक्ट करू शकता.
Web Summary : Zoho's Arattai, a 'Made in India' messaging app, aims to compete with WhatsApp. Designed for low bandwidth, it boasts features like group chat, file sharing, and strong security. It's gaining popularity, especially in rural areas.
Web Summary : ज़ोहो का 'अरट्टई' ऐप, WhatsApp को टक्कर देने के लिए तैयार है। यह कम बैंडविड्थ पर भी काम करता है और इसमें ग्रुप चैट, फाइल शेयरिंग जैसे फीचर्स हैं। यह 'मेड इन इंडिया' ऐप ग्रामीण क्षेत्रों में लोकप्रिय हो रहा है।