Join us
Daily Top 2Weekly Top 5

जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या कंपन्या कोणत्या? टॉप १० मध्ये किती भारतीय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 15:11 IST

top 10 companies : उत्पन्नाच्या बाबतीत जगातील टॉप १० कंपन्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ज्यामध्ये अमेरिकेचे वर्चस्व पाहायला मिळत आहे.

top 10 companies : जगातील सर्वात शक्तिशाली अर्थव्यवस्था कोणती, याचे मोजमाप अनेकदा कंपन्यांच्या महसुलावरून केले जाते. नुकत्याच जाहीर झालेल्या ताज्या आकडेवारीनुसार, महसुलाच्या बाबतीत अमेरिकेने पुन्हा एकदा आपले जागतिक वर्चस्व सिद्ध केले आहे. जगातील पहिल्या १० सर्वाधिक महसूल कमावणाऱ्या कंपन्यांमध्ये चक्क ७ कंपन्या एकट्या अमेरिकेच्या आहेत. विशेष म्हणजे, किरकोळ विक्री क्षेत्रातील दिग्गज कंपनी 'वॉलमार्ट' ७०३ अब्ज डॉलर्सच्या महसुलासह पहिल्या स्थानी कायम आहे.

जगातील टॉप १० महसूल कंपन्या (अब्ज डॉलर्समध्ये)

क्र. कंपनी महसूल (अब्ज $) देश 
१ वॉलमार्ट ७०३.०६अमेरिका
अमेझॉन ६९१.३३ अमेरिका
सौदी अरामको४६१.५६ सौदी अरब
सिनोपेक ४४४.७४ चीन 
युनायटेड हेल्थ४३५.१५ अमेरिका 
ॲपल ४१६.१६ अमेरिका 
बर्कशायर हॅथवे३९७.१४ अमेरिका 
पेट्रोचायना ३९४.६२ चीन 
सीव्हीएस हेल्थ ३९४.०८ अमेरिका 
१०मॅककेसन ३८७.०९ अमेरिका 

(टीप: हा डेटा जुलै २०२४ ते सप्टेंबर २०२५ या कालावधीतील आर्थिक अहवालांवर आधारित आहे.)

भारतीय कंपन्या कोठे आहेत?महसुलाच्या जागतिक क्रमवारीत भारतीय कंपन्या अद्याप पहिल्या ५० च्या बाहेर आहेत. मात्र, देशांतर्गत पातळीवर रिलायन्सने आपले अव्वल स्थान टिकवून ठेवले आहे.रिलायन्स इंडस्ट्रीज : ११४.६० अब्ज डॉलर्सच्या महसुलासह रिलायन्स जगात ६५ व्या क्रमांकावर आहे.एलआयसी : १०६.१६ अब्ज डॉलर्ससह एलआयसी ६८ व्या क्रमांकावर आहे.इंडियन ऑईल : ८८.३६ अब्ज डॉलर्ससह इंडियन ऑईलने जगात ९७ वे स्थान पटकावले आहे.

वाचा - अडीच कोटींच्या फ्लटची तब्बल २५ वेळी विक्री! तुम्ही घर खरेदी किंवा विक्री करताना काय काळजी घ्यावी?

अमेरिकेचे पारडे जड का?टॉप १० मधील ७ कंपन्या अमेरिकेच्या असणे हे तिथल्या तंत्रज्ञान, आरोग्य सेवा आणि किरकोळ विक्री क्षेत्रातील मजबूत पकड दर्शवते. सौदी अरबची 'सौदी अरामको' ही तेल कंपनी तिसऱ्या क्रमांकावर असून चीनच्या 'सिनोपेक' आणि 'पेट्रोचायना' या ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांनीही आपला दबदबा कायम ठेवला आहे. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Top global companies by revenue: How many Indian firms feature?

Web Summary : US dominates top 10 revenue-generating companies, led by Walmart. Reliance is India's top firm, ranking 65th globally. Technology and healthcare drive US success.
टॅग्स :व्यवसायअमेरिकासौदी अरेबियाचीनरिलायन्स