Join us
Daily Top 2Weekly Top 5

तेलाचा भडका आणि डॉलरची ताकद; यावेळी सोनं का साथ देईना? वाचा सविस्तर विश्लेषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 14:27 IST

Gold Down in Risk : तुम्हाला कदाचित माहित असेल की जेव्हा जेव्हा जागतिक धोका वाढतो, तेव्हा गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक करतात आणि त्याच्या किमती घसरू लागतात. गेल्या वर्षभरापासून हेच ​​घडत आहे. पण इराण युद्धाच्या काळात, जेव्हा एक मोठे जागतिक संकट उभे ठाकले होते, तेव्हा सोन्याच्या किमती सतत का घसरत राहिल्या?

Gold Prices are Falling : शेअर बाजारात पडझड झाली किंवा जगात युद्धाचा भडका उडाला की गुंतवणूकदार सुरक्षित आश्रय म्हणून सोन्याकडे धाव घेतात, हा आजवरचा शिरस्ता आहे. रशिया-युक्रेन युद्ध असो वा गेल्या वर्षीची इराणवरील क्षेपणास्त्रे, प्रत्येक वेळी सोन्याने गुंतवणूकदारांना सावरले आहे. मात्र, यावेळी इस्रायल-इराण युद्धाच्या धधगत्या आगीत सोने 'कुंदन' बनून चमकण्याऐवजी सातत्याने घसरत आहे. संकटाच्या काळात 'खरा' उतरणारा हा धातू यावेळी गुंतवणूकदारांमध्ये असुरक्षितता का निर्माण करत आहे, याचा घेतलेला हा विशेष आढावा.

किमतींमधील मोठी उलथापालथया वर्षाच्या सुरुवातीला जागतिक बाजारपेठेत सोन्याचे भाव ५,६०० डॉलर प्रति औंसच्या आसपास होते, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट होते. मात्र, युद्ध सुरू झाल्यापासून सोन्याच्या भावात २० टक्क्यांपर्यंत मोठी घसरण झाली आहे. दशकाचा विचार करता सोन्याचे भाव ३ पटीने वाढले असले, तरी सध्याच्या अनपेक्षित घसरणीने गुंतवणूकदारांना नवीन विचार करायला भाग पाडले आहे.

इतिहासातील 'सेफ हेवन'ची कामगिरी

  • २००८ ची मंदी : जागतिक आर्थिक मंदीच्या काळात सोने सर्वात स्थिर राहिले. इतर मालमत्तांच्या तुलनेत सोन्याने गुंतवणूकदारांचा विश्वास सार्थ ठरवला.
  • २०११ चे रेटिंग संकट : जेव्हा अमेरिकेचे 'AAA' क्रेडिट रेटिंग घटवले गेले, तेव्हा सोन्याच्या किमतींनी मोठी उसळी घेतली होती.
  • कोरोना काळ : लॉकडाऊनमध्ये जेव्हा शेअर बाजार कोलमडले होते, तेव्हाही सोने आणि चांदीला मोठी मागणी होती.

यावेळी चित्र वेगळे का?

  • तज्ज्ञांच्या मते, यावेळी सोन्याची चमक कमी होण्यामागे 'तेल' आणि 'डॉलर' ही दोन मुख्य कारणे आहेत.
  • कच्च्या तेलाची औद्योगिक मागणी : सोन्याच्या तुलनेत सध्या कच्च्या तेलाची मागणी औद्योगिक स्तरावर प्रचंड आहे. युद्धामुळे तेलाचा पुरवठा खंडित होण्याची भीती असल्याने गुंतवणूकदारांनी सोन्यापेक्षा तेलाला प्राधान्य दिले आहे.
  • डॉलरचा वाढता वरचश्मा : जगातील ९० टक्क्यांहून अधिक तेलाचा व्यापार डॉलरमध्ये होतो. तेलाची मागणी वाढल्याने डॉलरची मागणीही वाढली आणि पर्यायाने डॉलर मजबूत झाला.

वाचा - गुंतवणूकदारांनो सावधान! 'वेट अँड वॉच' हीच सध्याची रणनीती; 'या' शेअर्समध्ये दूर रहा, दिग्गज ब्रोकरेजचा सल्ला

डॉलर आणि बॉण्ड्सची 'सुनामी'

  • डॉलर मजबूत झाल्याचा थेट परिणाम अमेरिकन अर्थव्यवस्थेवर आणि पर्यायाने सोन्यावर झाला आहे.
  • गुंतवणूकदारांचे स्थलांतर : अमेरिकन ट्रेझरी बॉण्ड्सच्या परताव्यामध्ये मोठी वाढ झाल्याने गुंतवणूकदारांनी सोने आणि चांदी विकून आपला पैसा डॉलर आणि यूएस बॉण्ड्समध्ये लावायला सुरुवात केली आहे.
  • विक्रमी पैसे काढले : केवळ २ तासांत गुंतवणूकदारांनी सोने आणि चांदीतून तब्बल २ ट्रिलियन डॉलरहून अधिक रक्कम काढून घेतल्याचे धक्कादायक वृत्त आहे.
  • रुपयावर दबाव : डॉलरच्या या मजबुतीमुळे भारतीय रुपयाने इतिहासात पहिल्यांदाच ९४ चा स्तर ओलांडला असून तो विक्रमी निचांकावर पोहोचला आहे.
English
हिंदी सारांश
Web Title : Gold prices plummet despite geopolitical tensions: A detailed analysis

Web Summary : Despite global turmoil, gold prices are falling due to strong dollar and high crude oil demand. Investors are shifting to US bonds, weakening gold's safe-haven appeal, and impacting the Indian Rupee.
टॅग्स :सोनंचांदीइंधन टंचाईअमेरिका-इस्रायल-इराण वॉरशेअर बाजार