नवी दिल्ली : हल्ली इन्स्टाग्राम आणि यूट्यूब यांसारख्या समाजमाध्यम मंचांवरून क्रिएटर्स आणि इन्फ्ल्यूएन्सर्स सक्रिय असतात आणि त्यातून चांगले उत्पन्नही मिळवतात. यूट्यूबवर कमाईचे अधिक फिचर्स उपलब्ध आहेत. मात्र, तुमच्याकडे मजबूत व सक्रिय फॉलोइंग असेल, तर इन्स्टाग्रामवरही तुम्ही उत्तम कमाई करू शकता.
यूट्यूबचे मॉडेल कसे?- जाहिराती : यूट्यूबर्सना यात व्हिडीओसोबत दाखवलेल्या जाहिरातीमधून महसूल मिळतो.- सुपरचॅट व सुपर स्टिकर्स : याद्वारे लाइव्ह स्ट्रीमिंगवेळी दर्शक पसंतीच्या यूट्यूबरला पैसे पाठवू शकतात.- सदस्यता : चॅनलच्या सब्सक्राइबर्सना एक विशेष सदस्यता सेवा मिळते. त्यातून अतिरिक्त कंटेंट पाहता येतो. त्याद्वारेही यूट्यूब क्रिएटर्सना महसूल मिळतो.- प्रायोजकता (स्पॉन्सरशिप) : त्यात ब्रँड्स आपली उत्पादने प्रमोट करण्यासाठी यूट्यूब क्रिएटर्ससोबत भागीदारी करतात.
कसे चालते इन्स्टाग्राम?- ब्रँड स्पॉन्सरशिप : ब्रँड्स स्पॉन्सरशिप हे उत्पन्नाचे सर्वांत मोठे साधन आहे. भरपूर फॉलोअर्स असल्यास कंपन्या आपले ब्रँड्स प्रमोट करण्यासाठी खातेधारकास पैसे देतात.- एफिलिएट मार्केटिंग : त्यात इन्स्टाग्राम खात्यावरून उत्पादनाचा प्रचार करता येतो. प्रत्येक विक्रीवर खातेधारकास कमिशन मिळते.- उत्पादन विक्री : इन्स्टाग्रामच्या शॉपिंग फीचरवर तुम्ही स्वत:ची उत्पादने विकू शकता.- इन्स्टाग्राम लाइव्ह : लाइव्ह व्हिडीओच्या वेळी लोक तुम्हाला देणग्या आणि भेट पाठवू शकतात.