Emmanuel Macron India Tour Networth: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे केवळ त्यांच्या राजकीय धोरणांमुळेच नव्हे, तर त्यांच्या वैयक्तिक उत्पन्नामुळे आणि मालमत्तेमुळेही नेहमी चर्चेत असतात. राजकारणात येण्यापूर्वी मॅक्रॉन यांनी आर्थिक क्षेत्रात, विशेषतः इनव्हेस्टमेंट बँकिंगमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांना किती पगार मिळतो आणि त्यांची एकूण संपत्ती किती आहे, याबद्दल अनेकांना उत्सुकता आहे. मॅक्रॉन यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत, त्यांची मालमत्ता आणि त्यांच्या व्यावसायिक प्रवासातील महत्त्वाचे टप्पे जाणून घेण्याचा प्रयत्न करुया.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!वेतन आणि मिळणाऱ्या सुविधा
'फायनान्स मंथली डॉट कॉम'नुसार, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष म्हणून इमॅन्युएल मॅक्रॉन यांचं वेतन सार्वजनिकरीत्या निश्चित असून ते फ्रेंच सरकारद्वारे नियंत्रित केलं जातं. २०२५ पर्यंत फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचे वार्षिक वेतन सुमारे १,८२,००० युरो म्हणजेच १,९५,२१,८६६ रुपये इतकं आहे. इतर अनेक देशांच्या सर्वोच्च नेत्यांच्या तुलनेत हे वेतन कमी मानलं जात असले, तरी ती एक मोठी रक्कम आहे. या वेतनासोबतच त्यांना अधिकृत निवासस्थान, पूर्ण सुरक्षा व्यवस्था आणि विविध भत्त्यांसारख्या अतिरिक्त सोयी-सुविधा पुरवल्या जातात. जरी त्यांचं राष्ट्राध्यक्ष पदाचं वेतन खूप जास्त नसले, तरी त्यांच्या उत्पन्नाचे इतरही अनेक स्त्रोत आहेत.
दोन दिवसांच्या घसरणीनंतर चांदी ५ हजारांनी महागली; सोन्याच्या दरातही वाढ, पाहा नवी किंमत
मॅक्रॉन यांची एकूण संपत्ती
२०२५ पर्यंत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची एकूण संपत्ती अंदाजे ४० ते ५० मिलियन अमेरिकन डॉलर्स इतकी आहे. त्यांच्या संपत्तीचा मोठा हिस्सा राजकारणात येण्यापूर्वीच्या त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीशी संबंधित आहे. राजकारणात पाऊल ठेवण्यापूर्वी त्यांनी फ्रान्समधील प्रतिष्ठित गुंतवणूक बँक 'Rothschild & Cie' मध्ये काम केले होते. या काळात त्यांनी अनेक मोठे करार यशस्वीपणे हाताळले, ज्यात चॉकलेट कंपनी 'St. Louis' च्या अधिग्रहणाशी संबंधित कराराचाही समावेश होता.
इनव्हेस्टमेंट बँकर म्हणून त्यांनी मिळालेला आर्थिक मोबदलाच त्यांच्या सध्याच्या मजबूत आर्थिक स्थितीचा पाया ठरलाय. त्यांच्या एकूण संपत्तीत त्यांच्या पत्नीचं उत्पन्न आणि विविध गुंतवणुकींचाही मोलाचा वाटा आहे.
Web Summary : French President Macron's salary is around €182,000 annually. His net worth is estimated between $40-50 million, largely from his investment banking career at Rothschild & Cie, where he handled significant deals. His wife's income and investments also contribute to his wealth.
Web Summary : फ्रांसीसी राष्ट्रपति मैक्रों का वेतन लगभग €182,000 सालाना है। उनकी कुल संपत्ति लगभग $40-50 मिलियन है, जो मुख्य रूप से रोथ्सचाइल्ड एंड सीआईई में उनके निवेश बैंकिंग करियर से है, जहां उन्होंने महत्वपूर्ण सौदे किए। उनकी पत्नी की आय और निवेश भी उनकी संपत्ति में योगदान करते हैं।