Share Market Investment: शेअर बाजारात लोक अनेकदा लवकर श्रीमंत होण्यासाठी शॉर्टकट शोधतात. कोणी टिप्स फॉलो करतो, तर कोणी ट्रेंड. पण काही लोक गर्दीपेक्षा पूर्णपणे वेगळा विचार करतात. त्यापैकीच एक आहेत संजय बख्शी (Sanjay Bakshi). आज त्यांची गणना भारतातील सर्वात नामांकित व्हॅल्यू इन्व्हेस्टर्समध्ये केली जाते.
१९९० च्या दशकाच्या सुरुवातीला बख्शी लंडनमध्ये बर्गर किंगमध्ये पार्ट टाइम काम करत होते. घरभाड्यासाठी विचार करत असतानाच त्यांनी एक अशी गोष्ट शोधली, ज्यामुळे त्यांच्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलली, ती म्हणजे 'मोट इन्व्हेस्टिंग' (Moat Investing).
त्या वेळी त्यांनी वॉरेन बफे यांचे लेखन वाचायला सुरुवात केली. त्यांच्या लक्षात आलं की, बाजारात खरी जिंक स्वस्त वस्तू खरेदी करण्यात नाही, तर मजबूत कंपन्यांना ओळखण्यात आहे. अशा कंपन्या, ज्यांच्याभोवती 'मोट' (Moat) असतो. हा मोट त्यांना प्रतिस्पर्धकांपासून वाचवतो आणि दीर्घकाळ टिकणारा नफा मिळवून देतो.
मोट इन्व्हेस्टिंग म्हणजे काय?
मोट इन्व्हेस्टिंग हे काही तांत्रिक सूत्र नाही. ही एक साधी कल्पना आहे, अशा कंपन्यांमध्ये पैसे गुंतवा ज्यांना हरवणं कठीण आहे. याचा अर्थ, ज्यांचा ब्रँड खूप मजबूत आहे, ज्यांची टेक्नॉलॉजी किंवा उत्पादन कॉपी करता येत नाही, ज्यांची वितरण चेन इतकी मोठी आहे की, कोणत्याही नवीन खेळाडूला जागा बनवणं कठीण आहे, ज्यांचे ग्राहक वारंवार परत येतात, ज्यांचं नेतृत्व विश्वासार्ह आणि स्थिर आहे. अशा कंपन्या महाग वाटू शकतात, पण त्या वर्षानुवर्षे जास्त चढ-उताराशिवाय संपत्ती निर्माण करतात.
बर्गर पासून 'मोट इन्व्हेस्टर' बनण्यापर्यंतचा प्रवास
संजय बख्शी यांनी सुरुवातीला बहुतेक व्हॅल्यू इन्व्हेस्टर्सप्रमाणेच स्वस्त कंपन्यांचा शोध घेतला. पण २०१२ मध्ये त्यांनी स्वतःला पूर्णपणे रीसेट केलं. त्यांनी 'स्वस्त स्टॉक्स' सोडून पूर्णपणे 'मोट' असलेल्या कंपन्यांवर लक्ष केंद्रित केलं. हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरला. त्यांचं म्हणणं आहे की, २००१ ते २०१२ दरम्यान त्यांनी सुमारे २४ टक्के वार्षिक परतावा कमावला, पण 'मोट इन्व्हेस्टिंग' स्वीकारल्यानंतर हा परतावा जवळपास ४५ टक्के वार्षिक पर्यंत पोहोचला. त्यांचा विचार सरळ होता. चांगली कंपनी मिळाल्यास किंमत जास्त असली तरी खरेदी करा, वारंवार ट्रेडिंग करण्याऐवजी, त्याला दीर्घकाळ टिकवून ठेवा, कंपनीचा मोट, व्यवस्थापन आणि वाढ तपासणी यादीतून पारखून घ्या. याच दृष्टिकोनातून त्यांनी अंबिका कॉटन, वंडरला हॉलिडेज, पिडिलाइट इंडस्ट्रीज आणि रिलॅक्सो फुटवेअर्स यांसारख्या दर्जेदार कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली.
२०१४ मध्ये बख्शी यांनी परेश ठक्कर यांच्यासह व्हॅल्यू क्वेस्ट कॅपिटल (ValueQuest Capital) सुरू केली. त्यांचे पहिले वर्षच धमाकेदार ठरले; फंडाने जवळपास ६९ टक्के परतावा दिला, तर त्याच वेळी बाजारात केवळ १७ टक्के वाढ झाली होती. पुढे त्यांचा इंडिया मोट फंड देखील उत्कृष्ट कामगिरी करणारा ठरला.
सर्वात खास गोष्ट म्हणजे, हा फंड फक्त ११ कंपन्यांवर लक्ष केंद्रित करतो. यापैकी बहुतेक कंपन्या कर्जमुक्त (Debt-free) आहेत आणि वर्षानुवर्षे नफ्यात वाढ करत आहेत. जागतिक गुंतवणूकदारांनीही या मॉडेलची प्रशंसा केली. २०१८ मध्ये Oaktree Capital चे हॉवर्ड मार्क्स यांचे पुत्र अँड्र्यू मार्क्स यांनी व्हॅल्यू क्वेस्टमध्ये हिस्सा खरेदी केला.
Web Summary : Sanjay Bakshi, once at Burger King, embraced 'Moat Investing', focusing on companies with strong competitive advantages. This strategy, inspired by Warren Buffett, led to substantial returns, transforming Bakshi into a renowned value investor with ValueQuest Capital.
Web Summary : कभी बर्गर किंग में काम करने वाले संजय बख्शी ने 'मोट निवेश' अपनाया, जो मजबूत प्रतिस्पर्धी लाभ वाली कंपनियों पर केंद्रित था। वॉरेन बफे से प्रेरित इस रणनीति से भारी रिटर्न मिला, जिससे बख्शी वैल्यू क्वेस्ट कैपिटल के साथ एक प्रसिद्ध मूल्य निवेशक बन गए।