Join us
Daily Top 2Weekly Top 5

काय आहे Anthropic AI टूल? ज्यानं जगभारतील आयटी कंपन्यांना जमिनीवर आपटलं, १.७५ लाख कोटींचं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 15:18 IST

Anthropic AI Tool Impact On IT Stocks: एंथ्रोपिक (Anthropic) या कंपनीच्या नवीन एआय (AI) टूलमुळे भारत आणि जगातील आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. जाणून घ्या काय आहे हे टूल.

Anthropic AI Tool Impact On IT Stocks: एंथ्रोपिक (Anthropic) या कंपनीच्या नवीन एआय (AI) टूलमुळे भारत आणि जगातील आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. विश्लेषकांनी या टूलबद्दल सावधगिरीचा इशारा दिला आहे. हे टूल इतके शक्तिशाली आहे की ते सॉफ्टवेअर कंपन्या करत असलेली बहुतांश कामं करू शकते. संपूर्ण बिझनेस वर्कफ्लो हाताळण्यासाठी याची रचना करण्यात आली आहे.

एंथ्रोपिकच्या नवीन एआय टूलची वैशिष्ट्ये

एंथ्रोपिकच्या नवीन वर्कप्लेस प्रॉडक्टिव्हिटी आणि ऑटोमेशन टूल्सच्या येण्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये अशी चर्चा सुरू झाली आहे की, पारंपारिक SaaS प्लॅटफॉर्म्सची आता गरज उरेल का? या टूलमध्ये अनेक प्रकारची गुंतागुंतीची कामे स्वतंत्रपणे करण्याची क्षमता आहे. या अपग्रेडेड सिस्टिममध्ये अनेक ऑटोमेशन प्लगइन देण्यात आले आहेत, जे साध्या एआय असिस्टन्सच्या तुलनेत अत्यंत प्रगत आहेत.

एंथ्रोपिकची टूल्स कोणती कामं करू शकतात?

या वर्कप्लेस ऑटोमेशन टूल्समुळे सॉफ्टवेअर वापरताना कर्मचाऱ्यांना मदत करण्याऐवजी एआय स्वतः संपूर्ण ऑपरेशनल प्रक्रिया पूर्ण करू शकते. यामध्ये लीगल डॉक्युमेंट्स रिव्ह्यू, कंप्लायन्स चेक, सेल्स प्लॅनिंग, मार्केटिंग मोहीम विश्लेषण, आर्थिक ताळमेळ, डेटा व्हिज्युअलायझेशन, एसक्यूएल-आधारित रिपोर्टिंग आणि एंटरप्राइझ स्तरावरील डॉक्युमेंट सर्च यांसारख्या कामांचा समावेश आहे.

आयटी कंपन्यांवर होणारा परिणाम

सोप्या भाषेत सांगायचे तर, ज्या कामांसाठी पूर्वी वेगवेगळ्या सॉफ्टवेअर सबस्क्रिप्शनची गरज भासायची, ती सर्व कामे आता एकाच एआय-आधारित वातावरणात पूर्ण केली जाऊ शकतील. यामुळे पारंपारिक SaaS प्लॅटफॉर्म्सवरील कंपन्यांचं अवलंबित्व कमी होईल आणि एआय वर्कफ्लो इंजिन त्यांची जागा घेतील, अशी भीती वाढली आहे.

अमेरिकन आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण

एंथ्रोपिकच्या या टूलची बातमी आल्यानंतर ३ फेब्रुवारी रोजी मोठ्या अमेरिकन सॉफ्टवेअर कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी पडझड झाली. या शेअर्सच्या किमती ६ टक्क्यांपर्यंत घसरल्या, ज्यामुळे या कंपन्यांचं बाजार मूल्य २८५ अब्ज डॉलर्सनी कोसळलं. या टूलचा थेट परिणाम आयटी कंपन्यांच्या महसुलावर होईल, असं गुंतवणूकदारांचं मत आहे.

बाजारमूल्य लक्षणीयरीत्या घसरले

एंथ्रोपिकच्या वर्कप्लेस प्रोडक्टिव्हिटी टूलच्या लाँचनंतर एआयचा धोका वाढल्यानं, इन्फोसिस, विप्रो, एचसीएल टेक आणि पर्सिस्टंट सिस्टम्स सारख्या कंपन्यांचे शेअर्स घसरले, ज्यामुळे ₹१.७५ लाख कोटींचा फटका बसला. पर्सिस्टंटच्या शेअर्सना सर्वाधिक फटका बसला. निफ्टी आयटी इंडेक्स शेअर्सचे एकूण बाजारमूल्य ₹३० लाख कोटींवर घसरलं होतं.

English
हिंदी सारांश
Web Title : Anthropic AI tool shakes IT giants, causing $285 billion loss.

Web Summary : Anthropic's AI tool, capable of automating complex tasks, triggered a massive sell-off in IT stocks globally. Indian IT firms also faced a significant market cap decline, raising concerns about traditional SaaS platforms' future.
टॅग्स :आर्टिफिशिअल इंटेलिजन्सशेअर बाजारमाहिती तंत्रज्ञान