Join us

Iran Israel यांच्यात युद्ध; पण तुमच्या खिशाला कसा फटका बसणार? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 14:53 IST

Iran Israel War: कच्च्या तेलाच्या किमतीचा भडका उडून पेट्रोलचे दर २३० रुपये प्रति लिटरवर जाण्याची भीती

Iran Israel War: इराण आणि इस्रायलमधील संघर्ष गंभीर वळणावर पोहोचला असून, यामुळे मध्य पूर्वच नव्हे, तर संपूर्ण जग चिंताग्रस्त झालं आहे. या संघर्षाचा मोठा परिणाम नागरिकांच्या खिशावर होण्याची शक्यता आहे. या संघर्षामुळे जगभरात महागाई वाढण्याची भीती असून, याची सुरुवात तेलाच्या किमती वाढून झाली आहे. युद्ध लांबलं तर तेलाच्या किमतीचा आणखी भडका उडू शकतो. कच्च्या तेलाच्या किमती ११% पेक्षा जास्त वाढल्या असून, ते ७५.३२ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचलंय. २० टक्के तेल पुरवठा होर्मुजच्या खाडीतून जगभरात केला जातो.

भारतासाठी होर्मुजची खाडी हा मार्ग महत्त्वाचा आहे, कारण भारतात आयात होणारे दोन तृतीयांशपेक्षा जास्त तेल आणि अर्ध्याहून अधिक एलएनजी गॅस या मार्गानं भारतात आयात होतो. जर इराणनं हा मार्ग बंद केला तर पुरवठा साखळीशी संबंधित मोठ्या समस्या निर्माण होतील.

मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये

इराकचे परराष्ट्रमंत्री फुआद यांचा इशारा, म्हणाले... 

इराण आणि इस्रायल यांच्यात संघर्ष भडकल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढून प्रति बॅरल २०० ते ३०० डॉलर होऊ शकतात, असा इशारा इराकचे परराष्ट्रमंत्री फुआद हुसैन यांनी दिला आहे. या संघर्षातून तेलाच्या किमती वाढल्यास युरोपीय देशांत महागाईचा भडका उडेल. अशा परिस्थितीत इराकसारख्या तेल निर्यातदार देशांना तेल पुरवठा करणं कठीण होईल, असंही ते म्हणाले.

जर कच्च्या तेलाच्या किमती ३०० डॉलर प्रति बॅरल झाल्या तर भारतात पेट्रोलची किंमत २०० ते २३० रुपये प्रतिलिटर असेल. यामुळे देशात महागाईचा आगडोंब उसळेल. भारताचे दोन्ही देशांशी चांगले संबंध आहेत. मात्र तरीही आपण इस्रायलकडे अधिक झुकलेले आहोत.

कोणत्या वस्तू महागणार? 

साबण, सर्फ, बिस्किटे, रंग आणि पेये इलेक्ट्रॉनिक्स आणि गॅझेट्स, खतं, औद्योगिक सॉल्ट्स, रसायनं, प्लास्टिक, फळे, काजू, खाद्यतेल, लोह, पोलाद, यंत्रसामग्री, दागिने आणि रत्नं.

खिशावर परिणाम कसा?

  • वाहतूक महाग होईल ज्यामुळे वस्तू आणि किराणा माल महाग होऊ शकतो.
  • मंदावलेल्या आयातीमुळे इलेक्ट्रॉनिक्सच्या किमती वाढू शकतात.
  • पिकांचा खर्च वाढेल. यामुळे अन्नधान्याच्या किमती वाढतील.
टॅग्स :इराणइस्रायलयुद्ध