लंडन -अगुस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर करारातील मध्यस्थ ख्रिस्टियान मिशेल याचे प्रत्यार्पण झाल्यानंतर घाबरलेल्या विजय माल्याने बँकाचे थकीत कर्ज परत करण्याची तयारी दर्शवल्याचे बोलले जात होते. मात्र विजय माल्याने याचे खंडन केले असून, मिशेलचे प्रत्यार्पण आणि कर्जाची परतफेड करण्याची मी दर्शवलेली तयारी यांचा काहीही संबंध नाही, मात्र माझ्याकडचे कर्जाऊ पैसे परत घ्या, असे माल्याने म्हटले आहे. विविध बँकांचे नऊ हजार कोटी रुपये थकवून ब्रिटनमध्ये पसार झालेला उद्योगपती विजय माल्या याने बुधवारी ट्विट करून थकीत कर्जातील मुद्दल परत करण्याची तयारी दर्शवली होती. त्यानंतर अगुस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर करारातील मध्यस्थ ख्रिस्टियान मिशेल याचे प्रत्यार्पण झाल्याने माल्याने प्रत्यार्पणाला घाबरून कर्ज फेडण्याची तयारी दर्शवल्याची चर्चा सुरू झाली होती. विजय माल्याच्या प्रत्यार्पणाबाबत ब्रिटनमधील न्यायालयात सुनावणी सुरू आहे. तसेच बँकांचे नऊ हजार कोटी रुपये बुडवून पसार झालेल्या माल्याला भारतात परत आणण्यासाठी भारत सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत.
विजय माल्या म्हणतो, मिशेलच्या प्रत्यार्पणाशी संबंध नाही, माझे पैसे घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 13:32 IST
अगुस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर करारातील मध्यस्थ ख्रिस्टियान मिशेल याचे प्रत्यार्पण झाल्यानंतर घाबरलेल्या विजय माल्याने बँकाचे थकीत कर्ज परत करण्याची तयारी दर्शवल्याचे बोलले जात होते. मात्र...
विजय माल्या म्हणतो, मिशेलच्या प्रत्यार्पणाशी संबंध नाही, माझे पैसे घ्या
ठळक मुद्दे मिशेलचे प्रत्यार्पण आणि कर्जाची परतफेड करण्याची मी दर्शवलेली तयारी यांचा काहीही संबंध नाहीविविध बँकांचे नऊ हजार कोटी रुपये थकवून ब्रिटनमध्ये पसार झालेला उद्योगपती विजय माल्या याने बुधवारी ट्विट करून थकीत कर्जातील मुद्दल परत करण्याची तयारी दर्शवली होती