Dollar Vs Rupee: अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा परिणाम शेअर बाजारासोबतच भारतीय चलनावरही मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. डॉलरच्या तुलनेत बुधवारी रुपया घसरून नवीन नीचांकी पातळीवर पोहोचला. सुरुवातीच्या व्यवहारात रुपया ७१ पैशांनी घसरून अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ९२.१८ या विक्रमी नीचांकी स्तरावर आला.
२१ जानेवारीनंतरची ही सर्वात मोठी घसरण ठरली आहे. आशियाई चलनांमध्ये रुपयाची कामगिरी सर्वात खराब राहिली. डॉलर इंडेक्स, जो जगातील प्रमुख चलनांच्या तुलनेत डॉलरचा मागोवा घेतो, तो ०.३% वाढून ९९.३३ वर पोहोचला आहे. युद्धामुळे गुंतवणूकदार भारतासारख्या उदयोन्मुख बाजारपेठांमधून पैसे काढून सोनं आणि अमेरिकन ट्रेझरी बाँड्समध्ये सुरक्षितपणे गुंतवत आहेत, ज्यामुळे रुपयामध्ये मोठी घसरण झाली.
युद्धामुळे सोन्या-चांदीच्या किमतीचा भडका; पाहा दिल्ली ते मुंबई काय आहे आजचा लेटेस्ट दर?
कच्च्या तेलामुळे बाजाराचा मूड बिघडला
गेल्या आठवड्यात इराण युद्ध सुरू झाल्यापासून आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमती उच्च पातळीवर कायम आहेत. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती भारतासाठी मोठी नकारात्मक बाब आहे, कारण भारत आपल्या एकूण गरजेच्या सुमारे ८५% पेक्षा अधिक तेल आयात करतो. सरकारनं टंचाईची भीती दूर करण्यासाठी विनाअडथळा तेल पुरवठ्याचे आश्वासन दिलं आहे आणि मध्य पूर्वेतून पुरवठा खंडित झाल्यास रशियाकडून कच्चं तेल आयात करण्यावर विचार केला आहे.
विदेशी फंडांनी सातत्यानं पैसे काढून घेतल्यामुळे रुपयावर अधिक दबाव येत आहे. सोमवारी, विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ३,३०० कोटी रुपयांचे देशांतर्गत शेअर्स विकले, ज्यामुळे या वर्षात आतापर्यंत त्यांची विक्री १९,००० कोटी रुपये किंवा २.१ अब्ज डॉलर झाली आहे.
भारत मोठ्या प्रमाणात कच्चं तेल आयात करतो
मध्य पूर्वेतील वाढत्या वादामुळे भारतावर विविध बाह्य मार्गांनी परिणाम होण्याचा धोका आहे. देश आपल्या गरजेच्या ८५% पेक्षा जास्त कच्चे तेल आयात करतो, ज्यामुळे तेलाच्या किमतीत होणाऱ्या बदलांप्रती रुपया अत्यंत संवेदनशील होतो. यामुळे आयात बिल वाढतं, चालू खात्यातील तूट वाढते आणि महागाई वेगानं वाढते. तसंच, वाढत्या जोखमीमुळे भारतीय इक्विटीमधून विदेशी पोर्टफोलिओचा पैसा बाहेर जाऊ शकतो, तर मध्य पूर्वेतील आर्थिक हालचालींमधील कोणत्याही अडथळ्याचा परिणाम या भागात काम करणाऱ्या भारतीयांकडून येणाऱ्या पैशावर होऊ शकतो.
Web Summary : The rupee plummeted to a record low of 92.18 against the dollar amid US-Israel-Iran war fears. Rising oil prices and foreign fund outflows exacerbate the situation. Investors seek safe havens like gold, impacting emerging markets like India, increasing import bills and inflation.
Web Summary : अमेरिका-इज़राइल-ईरान युद्ध के डर के बीच रुपया डॉलर के मुकाबले 92.18 के रिकॉर्ड निचले स्तर पर आ गया। बढ़ते तेल की कीमतें और विदेशी फंड की निकासी स्थिति को और बढ़ा रही है। निवेशक सोने जैसे सुरक्षित ठिकाने की तलाश में हैं, जिससे भारत जैसे उभरते बाजार प्रभावित हो रहे हैं, आयात बिल और मुद्रास्फीति बढ़ रही है।