Join us

इराणकडून तेल खरेदी करण्याची सूट अमेरिकेकडून रद्द, भारतात पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 21:43 IST

इराणकडून खनिज तेलाची खरेदी केल्यास घालण्यात येणाऱ्या निर्बंधामध्ये कोणत्याही प्रकारची सूट न देण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला आहे.

 वॉशिंग्टन - इराणकडून खनिज तेलाची खरेदी केल्यास घालण्यात येणाऱ्या निर्बंधामध्ये कोणत्याही प्रकारची सूट न देण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला आहे. व्हाइट हाऊसने सोमवारी एक वक्तव्य प्रसिद्ध करून ही माहिती दिली आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात इराणकडून होणारा तेलपुरवठा बंद होण्याच्या परिस्थितीत जागतिक बाजारपेठेतील मागणी पूर्ण करण्यासाठी योग्य ती पावले पावले उचण्याबाबत सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि अमेरिकेमध्ये एकमत झाले आहे. मात्र अमेरिकेच्या या निर्णयामुळे इराणकडून होणारा तेलपुरवठा खंडित झाल्यास भारतात तेलाच्या किमतींचा भडका उडू शकतो. दरम्यान, अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून करण्यात आलेल्या या घोषणेबाबत आम्हाला माहिती आहे. आम्ही या निर्णयाच्या विविध पैलूंचा अभ्यास करत आहोत. आता योग्यवेळी आम्ही याबाबत प्रतिक्रिया देऊ, असे भारत सरकारमधील सूत्रांनी सांगितले.इराणने केलेल्या विद्ध्वंसक कारवायांमुळे अमेरिका आणि त्याचे मित्र देश तसेच मध्य पूर्व आशियातील सुरक्षेसाठी धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हा धोका संपवण्यासाठी ट्रम्प सरकार आणि अमेरिकेचे सहकाऱी देश इराणवर लादलेले आर्थिक निर्बंध कायम ठेवून ते अधिकाधिक कठोर करण्यासाठी कटिबद्ध आहे.  इराण आणि सहा अण्वस्रसंपन्न देशांमध्ये झालेला अण्वस्र करार ट्रम्प यांनी रद्द केल्यानंतर अमेरिकेने गरवर्षी नोव्हेंबर महिन्यात इराणकडून होणाऱ्या तेलाच्या निर्यातीवर निर्बंध लादले होते.  

टॅग्स :अमेरिकाइराणखनिज तेलभारत