Union Budget
Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेमीकंडक्टरमध्ये भारताचा 'मास्टरस्ट्रोक'! ४०,००० कोटींच्या निधीची घोषणा; चीनची मक्तेदारी संपणार?

सेमीकंडक्टरमध्ये भारताचा 'मास्टरस्ट्रोक'! ४०,००० कोटींच्या निधीची घोषणा; चीनची मक्तेदारी संपणार?

Semiconductor Budget : भारताला जागतिक सेमीकंडक्टर हब बनवण्याच्या इच्छेनुसार, सरकारने या वर्षीच्या अर्थसंकल्पात यासाठी ४०,००० कोटी रुपये वाटप केले आहेत जेणेकरून देशातील चिप बाजारपेठ अधिक विकसित होऊ शकेल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 11:51 IST2026-02-01T11:51:55+5:302026-02-01T11:51:55+5:30

Semiconductor Budget : भारताला जागतिक सेमीकंडक्टर हब बनवण्याच्या इच्छेनुसार, सरकारने या वर्षीच्या अर्थसंकल्पात यासाठी ४०,००० कोटी रुपये वाटप केले आहेत जेणेकरून देशातील चिप बाजारपेठ अधिक विकसित होऊ शकेल.

Union Budget 2026: ₹40,000 Crore Allocated for Semiconductor Ecosystem & Launch of ISM 2.0 | सेमीकंडक्टरमध्ये भारताचा 'मास्टरस्ट्रोक'! ४०,००० कोटींच्या निधीची घोषणा; चीनची मक्तेदारी संपणार?

सेमीकंडक्टरमध्ये भारताचा 'मास्टरस्ट्रोक'! ४०,००० कोटींच्या निधीची घोषणा; चीनची मक्तेदारी संपणार?

Semiconductor Budget : आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात भारताला जागतिक स्तरावर 'टेक पॉवरहाऊस' बनवण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सादर केलेल्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात देशाच्या सेमीकंडक्टर परिसंस्थेला बळकट करण्यासाठी ४०,००० कोटी रुपयांच्या भरीव निधीची घोषणा केली आहे. यासोबतच, भारताला चिप उत्पादनाचे केंद्र बनवण्यासाठी 'इंडियन सेमीकंडक्टर मिशन २.०' लाँच करण्याचे जाहीर केले आहे.

हा ४०,००० कोटींचा 'बूस्टर डोस' का आहे महत्त्वाचा?
सेमीकंडक्टर क्षेत्रातील ही गुंतवणूक केवळ आर्थिक तरतूद नसून, भारताच्या 'हाय-टेक' भविष्याचा पाया आहे.

  • जागतिक पुरवठा साखळी आणि भू-राजकीय तणाव : सध्या जागतिक स्तरावर चिप्सच्या पुरवठा साखळीत अनेक अडथळे आहेत. वाढत्या भू-राजकीय तणावादरम्यान इतर देशांवर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःचे उत्पादन असणे भारताच्या संरक्षणासाठी आणि अर्थव्यवस्थेसाठी गरजेचे आहे.
  • भविष्यातील तंत्रज्ञानाचे इंधन : 5G/6G टेलिकॉम, इलेक्ट्रिक वाहने, एआय, संरक्षण क्षेत्र आणि कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्समध्ये चिप्सची मागणी प्रचंड वाढत आहे. ही वाढती गरज देशांतर्गत उत्पादनातून पूर्ण करणे हे या गुंतवणुकीचे मुख्य उद्दिष्ट आहे.
  • 'विकसित भारत @ २०३०' : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'विकसित भारत' व्हिजनसाठी हे क्षेत्र कणा मानले जात आहे. २०३० च्या दशकापर्यंत भारताला जगातील प्रमुख सेमीकंडक्टर हब बनवण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे.

'ISM 2.0': आत्मनिर्भरतेचे नवे पर्व

अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, केवळ चिप बनवून भारत थांबणार नाही, तर या क्षेत्रातील संपूर्ण 'सप्लाय चेन'वर भारताचे वर्चस्व असावे, हा सरकारचा उद्देश आहे.

वाचा - बजेटपूर्वी सोने-चांदी धडाम! चांदी ९% तर सोने ६% कोसळले, खरेदीची संधी की अजून घसरण?

या मोहिमेचे प्रमुख पैलू

  • फुल स्टॅक डिझाइन : चिप्सचे डिझाइन करण्यापासून ते उत्पादनापर्यंत सर्व प्रक्रिया भारतातच होतील.
  • इंडियन IP (Intellectual Property) : भारताची स्वतःची बौद्धिक संपदा विकसित करण्यावर भर दिला जाईल.
  • कौशल्य विकास : उद्योगांच्या नेतृत्वाखालील संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रांद्वारे कुशल वर्कफोर्स तयार केला जाईल.
     

Web Title : सेमीकंडक्टर में भारत का मास्टरस्ट्रोक: चीन का एकाधिकार खत्म करने के लिए ₹40,000 करोड़ का प्रोत्साहन?

Web Summary : भारत ने ₹40,000 करोड़ के निवेश के साथ अपने सेमीकंडक्टर पारिस्थितिकी तंत्र को मजबूत किया, 'इंडियन सेमीकंडक्टर मिशन 2.0' लॉन्च किया। इसका उद्देश्य भारत को चिप निर्माण केंद्र के रूप में स्थापित करना, आयात पर निर्भरता को कम करना और 5G, AI और इलेक्ट्रिक वाहनों जैसी भविष्य की तकनीकों में आत्मनिर्भरता को बढ़ावा देना है, जिसका लक्ष्य 'विकसित भारत @ 2030' है।

Web Title : India's Semiconductor Masterstroke: ₹40,000 Crore Boost to End China's Monopoly?

Web Summary : India strengthens its semiconductor ecosystem with a ₹40,000 crore investment, launching 'Indian Semiconductor Mission 2.0'. This aims to establish India as a chip manufacturing hub, reducing reliance on imports and fostering self-reliance in future technologies like 5G, AI, and electric vehicles, targeting a 'Developed India @ 2030'.