Join us
Daily Top 2Weekly Top 5

आधार कार्ड अपडेट करणे महाग! 'ही' सेवा मोफत, पण केंद्रावर मोजावे लागतील जादा पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 17:01 IST

Aadhaar Update : UIDAI ने आधार अपडेट आणि PVC कार्डसाठी शुल्क वाढवले ​​आहे. या बातमीत, नाव, पत्ता, फोटो किंवा PVC कार्ड अपडेटसाठी तुम्हाला आता किती पैसे द्यावे लागतील ते जाणून घ्या.

Aadhaar Update : आधार कार्ड आता केवळ ओळखीचा पुरावा राहिलेला नसून, बँकिंगपासून सरकारी योजनांपर्यंत ते अनिवार्य झाले आहे. मात्र, कागदी आधार कार्ड लवकर खराब होणे किंवा फाटणे अशा तक्रारी येत होत्या. ही समस्या सोडवण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) आता PVC आधार कार्डची सुविधा अधिक सुलभ केली आहे. हे कार्ड केवळ टिकाऊच नाही, तर क्रेडिट कार्डप्रमाणे तुमच्या पाकिटात सहज मावू शकते. मात्र, आता आधारकार्डच्या सुविधांसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

काय आहे PVC आधार कार्ड?पीव्हीसी आधार कार्ड हे एटीएम कार्डप्रमाणे प्लास्टिकचे बनलेले असते. यात सुरक्षेचे अनेक प्रगत स्तर देण्यात आले आहेत. यामध्ये सुरक्षित क्यूआर कोड, होलोग्राम, मायक्रो टेक्स्ट आणि गिलोश पॅटर्नचा समावेश आहे. हे कार्ड अधिक मजबूत असून पाण्याने खराब होत नाही. तसेच यामुळे बनावट आधार कार्ड तयार करण्याच्या शक्यताही कमी झाल्या आहेत.

आधार अपडेट आणि शुल्कात बदल

  • जर तुम्ही स्वतः ऑनलाइन पद्धतीने नाव किंवा पत्ता बदलणार असाल, तर १४ जून २०२६ पर्यंत ही सेवा पूर्णपणे मोफत असेल.
  • आधार सेवा केंद्रावर नाव किंवा पत्ता बदलण्यासाठी आता ५० रुपयांऐवजी ७५ रुपये मोजावे लागतील.
  • केंद्रावर जाऊन फोटो अपडेट करण्यासाठी १२५ रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
  • साधे आधार कार्ड पुन्हा मिळवण्यासाठी ४० रुपये शुल्क लागेल.

वाचा - सावधान! तोतया पोलीस अधिकारी आणि कुरिअरचा सापळा; ८१ वर्षीय व्यावसायिकाला ७ कोटींचा चुना

घरबसल्या PVC आधार कार्ड कसे मागवायचे?

  • प्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाइटला (uidai.gov.in) भेट द्या.
  • 'Get Aadhaar' या विभागातील 'Order Aadhaar PVC Card' वर क्लिक करा.
  • तुमचा १२ अंकी आधार क्रमांक किंवा व्हर्च्युअल आयडी टाका आणि 'कॅप्चा' कोड भरा.
  • नोंदणीकृत मोबाईलवर आलेला ओटीपी प्रविष्ट करून पडताळणी करा.
  • या कार्डसाठी ५० रुपये (जीएसटी आणि स्पीड पोस्ट शुल्कासह) ऑनलाइन भरा. हे पेमेंट तुम्ही UPI, डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे करू शकता.
  • पेमेंट यशस्वी झाल्यानंतर, तुमचे नवीन 'स्मार्ट' आधार कार्ड टपालाने थेट तुमच्या घरी पोहोचेल.
English
हिंदी सारांश
Web Title : Aadhaar update costs rise; free online, extra at centers.

Web Summary : Updating Aadhaar online is free until June 2026. Center visits now cost more: ₹75 for address/name, ₹125 for photo. PVC Aadhaar cards, ordered online for ₹50, offer enhanced security and durability.
टॅग्स :आधार कार्डबँकिंग क्षेत्रऑनलाइनपैसा