Join us
Daily Top 2Weekly Top 5

Twitter ची ऑफिसेस अचानक बंद, Elon Musk यांच्या निर्णयानंतर शेकडो कर्मचाऱ्यांचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 11:15 IST

सर्व कार्यालयीन इमारती तात्काळ प्रभावाने बंद केल्या जात असल्याचे Twitter ने आपल्या कर्मचाऱ्यांना सांगितले.

ट्विटरवर सुरू असलेल्या गदारोळात एक मोठी बातमी समोर येत आहे. ट्विटरची सर्व कार्यालये तात्पुरती बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व कार्यालयीन इमारती तात्काळ प्रभावाने बंद केल्या जात असल्याचे कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना सांगितले. मात्र, हे का करण्यात आले याचे कारण देण्यात आलेले नाही. त्याचवेळी, कंपनीचे नवे मालक इलॉन मस्क यांनी 12 तास काम, सुट्टी नाही आणि वर्क फ्रॉम होम बंद केल्याचे फर्मान काढल्यानंतर एकाच दिवसात शेकडो कर्मचाऱ्यांनी ट्विटरवरून राजीनामा दिला आहे.कर्मचार्‍यांच्या राजीनाम्यादरम्यान, ट्विटरने केवळ कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला नाही, तर या माहितीसह लोकांना कडक इशाराही दिला आहे. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, ट्विटरने आपल्या कर्मचाऱ्यांना हा संदेश पाठवला-तात्काळ प्रभावाने, आम्ही कार्यालयाची इमारत तात्पुरती बंद करत आहोत. सर्व बॅज ॲक्सेस सस्पेंड राहतील. आता सोमवार, २१ नोव्हेंबर रोजी कार्यालये सुरू होतील. तुमच्या फ्लेक्झिबलिटीसाठी धन्यवाद. सोशल मीडिया, मीडिया किंवा कोठेही कंपनीची कोणतीही माहिती शेअर करणे किंवा त्यावर चर्चा करणे टाळा. Twitter च्या उज्ज्वल भविष्यात आम्ही तुमच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहोत.

सॅल्युट इमोजीसह राजीनामाब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार मस्क यांचे नवे निर्णय लागू होण्याच्या पूर्वीच शेकडो कर्मचाऱ्यांनी ट्विटर सोडण्याचा निर्णय घेतला. कंपनीचा चॅट ग्रुप सॅल्युटचे इमोजी आणि फेअरवेल मेसेजेसने भरला होता. एकूण किती कर्मचाऱ्यांनी कंपनीतून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला याची माहिती मात्र समोर आलेली नाही. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलेय की ट्’विटर इंजिनिअरची संपूर्ण टीम आपल्या मर्जीने काम सोडत आहे. परंतु यात जॉब मार्केट पुन्हा रिकव्हर करण्याची जोखीमही आहे. आम्ही स्किल्ड प्रोफेशनल आहोत, ज्यांच्याकडे अनेक पर्याय आहे. परंतु मस्क यांनी आम्हाला थांबण्याचे कोणतेही कारण दिले नाही. परंतु सोडण्याची कारणे दिली आहेत.’

टॅग्स :एलन रीव्ह मस्कट्विटर