Join us
Daily Top 2Weekly Top 5

५९ लाख युनिट्स विक्रीतून तब्बल ₹४७,२७० कोटींची कमाई; TVS ने सर्व रेकॉर्ड मोडले..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 15:13 IST

TVS Sales: सर्वाधिक कोणती गाडी विकल्या गेली? जाणून घ्या...

TVS Sales: भारतातील आघाडीची टू-व्हिलर कंपनी TVS Motor साठी सरलेले आर्थिक वर्ष २०२६ हे केवळ चांगले राहिलं नाही, तर रेकॉर्ड्स मोडीत काढणारे ठरले आहे. टू-व्हीलर, थ्री-व्हीलर आणि इलेक्ट्रिक व्हेईकल (EV) अशा सर्वच आघाड्यांवर कंपनीने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. 

ऐतिहासिक कामगिरी...

या आर्थिक वर्षात कंपनीने तब्बल ५९ लाख वाहनांची विक्री केली असून, कंपनीचा महसूल ४७,२७० कोटी रुपयांच्या नव्या उच्चांकावर पोहोचला आहे. टीव्हीएस मोटरच्या इतिहासात पहिल्यांदाच कंपनीने एवढा मोठा महसूल मिळवला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या (२०२५) तुलनेत यामध्ये ३० टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये कंपनीचा एकूण महसूल ३६,२५१ कोटी रुपये होता.

थ्री-व्हीलर बिझनेसमध्ये ६३% ची बंपर ग्रोथ

टीव्हीएसने केवळ दुचाकीच नाही, तर तिनचाकी वाहनांच्या बाजारपेठेतही सर्वांना थक्क केले आहे. कंपनीने या वर्षात २.१९ लाख तिनचाकी वाहने विकली आहेत, जी गेल्या काही वर्षांच्या तुलनेत तब्बल ६३ टक्के वाढ दर्शवते. दोन वर्षांपूर्वी कंपनी या आकड्याची केवळ कल्पना करू शकत होती, ती आता प्रत्यक्षात आली आहे.

बाईक्स आणि स्कूटर्सची विक्री किती झाली?

Bikes: कंपनीने या आर्थिक वर्षात २७.१३ लाख बाईक्सची विक्री केली आहे. वित्तवर्ष २०२५ मधील २१.९५ लाख युनिट्सच्या तुलनेत यामध्ये २४ टक्क्यांची वाढ झाली आहे.

Scooters: या काळात कंपनीने २४.१३ लाख स्कूटर्स विकल्या आहेत. वित्तवर्ष २०२५ मधील १९.०४ लाख युनिट्सच्या तुलनेत हा आकडा २७ टक्क्यांनी जास्त आहे.

'अपाचे' आणि 'रेडर १२५' ची सर्वाधिक विक्री

कंपनीच्या या अफाट विक्रीमध्ये Apache सिरीजचा मोठा वाटा आहे. त्याचसोबत TVS Raider 125 ही बाईक ग्राहकांच्या गळ्यातील ताईत बनली असून तिची बंपर विक्री झाली आहे.

EV सेगमेंटमध्येही कमाल

टीव्हीएसने पेट्रोल इंजिनसोबतच ईव्ही (EV) क्षेत्रातही आपली क्षमता सिद्ध केली आहे. ब्रँडच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत ३३ टक्क्यांची वाढ झाली असून ती ३.७१ लाख युनिट्सवर पोहोचली आहे (जी वित्तवर्ष २०२५ मध्ये २.७९ लाख होती). कंपनीची iQube सिरीज देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांपैकी एक ठरली आहे.

विशेष म्हणजे, फक्त जानेवारी ते मार्च २०२६ या शेवटच्या तिमाहीचा विचार केला, तर कंपनीने या तीन महिन्यांतच १२,८०८ कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे.

'TVS Raider 125' चा बाजारात बोलबाला

'टीव्हीएस रेडर १२५' ही कंपनीच्या इतिहासातील सर्वात यशस्वी बाईक्सपैकी एक ठरली आहे. लॉन्च झाल्यापासून आतापर्यंत या बाईकच्या १९ लाखांपेक्षा जास्त युनिट्सची विक्री झाली आहे. भारतात आतापर्यंत १६.२१ लाख रेडर बाईक्स विकल्या गेल्या आहेत. तर, परदेशात २.८६ लाख युनिट्स एक्सपोर्ट करण्यात आले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : TVS Breaks Records: ₹47,270 Crore Revenue from 59 Lakh Unit Sales!

Web Summary : TVS Motor's FY2026 shattered records with ₹47,270 crore revenue, a 30% increase. They sold 59 lakh vehicles, including 2.19 lakh three-wheelers (63% growth). Bikes sales rose 24% to 27.13 lakh, and scooters increased 27% to 24.13 lakh. Raider 125 sales boomed.
टॅग्स :वाहन उद्योगव्यवसायगुंतवणूकबाईकस्कूटर, मोपेड