Join us
Daily Top 2Weekly Top 5

रिलायन्स, एअरटेलसह टॉप १० पैकी ९ कंपन्यांना मोठा धक्का! पाहा कोणाचे किती नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 16:49 IST

MCap of Top 10 Companies : गेल्या आठवड्यात झालेल्या शेअर बाजारातील घसरणीमुळे नऊ प्रमुख कंपन्यांचे २.१८ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.

MCap of Top 10 Companies : शेअर बाजारातील पडझडीचा फटका केवळ छोट्या गुंतवणूकदारांनाच बसला नाही, तर देशातील दिग्गज कंपन्यांच्या मालमत्तेलाही मोठी गळती लागली आहे. गेल्या आठवड्यात दलाल स्ट्रीटवर आलेल्या मंदीच्या लाटेत भारतातील पहिल्या १० पैकी ९ बड्या कंपन्यांचे बाजारमूल्य तब्बल २,१८,९०२ कोटी रुपयांनी घटले आहे. जागतिक अस्थिरतेचा परिणाम या दिग्गज कंपन्यांच्या समभागांवर स्पष्टपणे दिसून आला.

कोणाला बसला सर्वाधिक फटका?नुकसान सोसणाऱ्या कंपन्यांच्या यादीत टेलिकॉम क्षेत्रातील दिग्गज कंपनी भारती एअरटेल आघाडीवर आहे.| कंपनीचे नाव | बाजारमूल्यातील घट (₹ कोटी) || भारती एअरटेल | ५५,८५२ || एचडीएफसी बँक | ३७,५८० || रिलायन्स इंडस्ट्रीज | ३४,८४६ || बजाज फायनान्स | २०,३१६ || टीसीएस | १८,१८१ || एलआयसी | १४,९९० || एल अँड टी | १३,७१५ || एसबीआय | १३,०६१ || आयसीआय बँक | १०,३६० |

कंपनीचे नावबाजारमूल्यातील घट (₹ कोटी)
भारती एअरटेल५५,८५२
एचडीएफसी बँक३७,५८०
रिलायन्स इंडस्ट्रीज३४,८४६
बजाज फायनान्स२०,३१६
टीसीएस१८,१८१
एलआयसी१४,९९०
एल अँड टी १३,७१५
एसबीआय१३,०६१ 
आयसीआय बँक १०,३६० 

(संदर्भ: मागील आठवड्यातील बीएसई आकडेवारी)

मंदीच्या पुरात 'हिंदुस्थान युनिलिव्हर'चा किल्ला शाबूतसर्वच दिग्गज कंपन्यांचे शेअर्स कोसळत असताना, एफएमसीजी क्षेत्रातील हिंदुस्थान युनिलिव्हर या कंपनीने मात्र आपली मजबूती दाखवून दिली. या पडझडीच्या काळातही HUL च्या बाजारमूल्यात ५,४६३ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या मागणीमुळे या कंपनीने गुंतवणूकदारांचा विश्वास टिकवून ठेवल्याचे दिसून येते.

वाचा - इराणचा सर्वोच्च नेता खामेनेईंच्या मृत्यूनंतर कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर संकट; पेट्रोल-डिझेल दरवाढीचे सावट

रिलायन्स अजूनही 'नंबर वन'इतक्या मोठ्या घसरणीनंतरही बाजारमूल्याच्या बाबतीत आघाडीच्या ३ कंपन्यांच्या क्रमवारीत कोणताही बदल झालेला नाही.

  1. रिलायन्स इंडस्ट्रीज: १८.८६ लाख कोटी
  2. HDFC बँक: १३.६५ लाख कोटी
  3. स्टेट बँक :११.०९ लाख कोटी 
English
हिंदी सारांश
Web Title : Top companies face huge losses; Reliance, Airtel hit hard.

Web Summary : Top 10 companies lost ₹2,18,902 crore in market value. Airtel suffered the most. HUL gained. Reliance still leads.
टॅग्स :शेअर बाजारस्टॉक मार्केटगुंतवणूकरिलायन्सएअरटेल