Join us

मौल्यवान धातूंचे दर वाढले; सोने ५००, चांदीत १,९०० रुपयांची वाढ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 20:03 IST

Today Gold Silver Rate: सोने आणि चांदीच्या किमतीवर ३ टक्के जीएसटी वेगळा आकारला जातो.

Today Gold Silver Rate:  नागपूर : आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींचा परिणाम भारतात विविध स्थानिक बाजारपेठांमध्ये दिसून येत आहे. नागपुरात सोमवारी सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली. दहा ग्रॅम सोने ५०० रुपये आणि किलो चांदी दरात १,९०० रुपयांची वाढ झाली.

सोमवारी दोन्ही मौल्यवान धातूंचे दर सहाव्यांदा वाढले. शनिवारच्या तुलनेत २४ कॅरेट सोने ५०० रुपयांच्या वाढीसह ७७,१०० रुपये आणि चांदी १,९०० रुपयांनी वाढून ९३,२०० रुपयांवर पोहोचली. त्यामुळे ग्राहकांची खरेदीसाठी पुन्हा गर्दी होऊ लागली आहे. दागिन्यांसाठी सर्वाधिक उपयोगात येणाऱ्या २२ कॅरेट सोन्याचे दर ७१,८०० रुपयांवर पोहोचले. सोने आणि चांदीच्या किमतीवर ३ टक्के जीएसटी वेगळा आकारला जातो.

नागपूर सराफा असोसिएशनचे पदाधिकारी म्हणाले, भारतात सोन्याची खरेदी गुंतवणुकीसह विविध समारंभासाठी केली जाते. शिवाय, अलिकडच्या काळात लोक सोन्यात अधिकाधिक गुंतवणूक करत आहेत. आर्थिक अनिश्चितता आणि शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे गुंतवणूकदारांना सोन्यात केलेली गुंतवणूक सुरक्षित वाटते.

टॅग्स :सोनंचांदीनागपूरव्यवसाय