Join us

इन्स्टा, युट्यूब Reels चा बाजार उठणार? TikTok पुन्हा एन्ट्री होणार? काय आहे इलॉन मस्कच्या मनात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 11:58 IST

TikTok Acquisition : कधीकाळी भारतीय तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे टिकटॉक पुन्हा भारतात सुरू होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

TikTok Acquisition : यंदाचा मराठी बिगबॉसचा विजेता सुरज चव्हाण सर्वांनाच माहिती आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर होण्याआधी सुरज टिकटॉक स्टार होता. गावखेड्यातील टॅलेंटला खऱ्या अर्थाने कोणी जगासमोर आणलं असेल तर ते TikTok App आहे. आज इन्स्टा रिल्स, युट्यूब शॉर्ट्स असे रिळ प्रकारातील अनेक सोशल माध्यमे उपलब्ध आहेत. मात्र, अजूनही लोकांच्या मनात टीकटॉकची जागा कायम आहे. काही वर्षांपूर्वी सरकारने चिनी अ‍ॅप्सवर बंदी आणली. त्यात टिकटॉकही होते. पण, हेच टिकटॉक पुन्हा एकदा भारतात सुरू होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

इलॉन मस्क टाकणार मोठा डाव?अमेरिकेत टिकटॉकवर बंदी घालण्याचा धोका आहे. TikTok अमेरिकेत सुरू राहील की नाही याचा निर्णय यूएस सुप्रीम कोर्ट घेईल. पण १० जानेवारीला या प्रकरणावरील सुनावणीत न्यायाधीशांची भूमिका पाहता TikTok ला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळेल असे वाटत नाही. हे पाहता चिनी अधिकारी आता TikTok च्या अमेरिकन ऑपरेशन्स वाचवण्यासाठी पर्यायी योजनेवर विचार करत आहेत. ब्लूमबर्गने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की जर अमेरिकेत टिकटॉकवर बंदी घातली गेली तर इलॉन मस्क यांना त्यांचा अमेरिकन व्यवसाय खरेदी करण्याची ऑफर दिली जाऊ शकते. TikTok वर बंदी घालण्याचे मुख्य कारण सुरक्षा चिंता आणि डेटा गोपनीयता हे आहे. जर ही बंदी लागू झाली तर त्याचा केवळ टिकटॉकवरच नाही तर चीन-अमेरिका संबंधांवरही परिणाम होऊ शकतो.

चीन सरकार, कोणत्याही किंमतीत, TikTok ची मालकी त्यांच्या मूळ कंपनी ByteDance Limited कडेच ठेवू इच्छित आहे. त्यामुळेच चीन टिकटॉकच्या भविष्याबाबत पर्यायी रणनीतीचा विचार करत आहे. सूत्रांनी सांगितले की चिनी अधिकाऱ्यांनी ट्रम्प प्रशासनासोबत काम करण्याच्या संभाव्य योजनांवर चर्चा सुरू केली आहे. यापैकी एका प्लॅनमध्ये इलॉन मस्कसाठी टिकटॉकचे यूएस ऑपरेशन्स घेण्याचा पर्याय समाविष्ट आहे. ट्रम्प यांच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या मस्क यांनी निवडणुकीदरम्यान ट्रम्प यांना २५ कोटी डॉलर्स दिले होते. मात्र, चिनी अधिकाऱ्यांनी अद्याप याबाबत कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही. बाइटडान्सला या चर्चांची माहिती आहे की नाही हे स्पष्ट नाही. तसेच, या संभाव्य डीलबाबत मस्क, टिकटॉक आणि बाइटडान्स यांच्यात काही चर्चा झाली आहे की नाही हे स्पष्ट नाही.

मस्क टिकटॉकवरील बंदीच्या विरोधातइलॉन मस्क यांनी अद्याप टिकटॉकच्या अमेरिकन व्यवसायाच्या अधिग्रहणावर भाष्य केलेले नाही. त्यांनी एप्रिलमध्ये X वर लिहिले होते, की “मला वाटते यूएसमध्ये टिकटॉकवर बंदी घातली जाऊ नये. असे केल्याने X चा फायदा होत असला तरी ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात असेल."

..तर भारतातही टिकटॉक सुरूही होईलजर इलॉन मस्क यांनी अमेरिकेतील टिकटॉक व्यवसाय खरेदी केला. तर तिथे यावर बंदी येणार नाही. याच धर्तीवर चिनी कंपनी पुन्हा एकदा भारतात प्रवेश करण्यासंबंधी विचार करू शकते. असे झाल्यास देशात पुन्हा एकदा टिकटॉकचं वारं येईल. सध्यातरी इन्स्टा आणि युट्यूबवरच लोक भागवत आहेत. मात्र, टिकटॉची एन्ट्री झाली तर या दोन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला पुन्हा एकदा तगडा स्पर्धक मिळेल.

टॅग्स :एलन रीव्ह मस्कसोशल मीडियाचीनटिक-टॉक