SIP-SWP Formula : स्वतःचा बंगला किंवा शहरात एखादा फ्लॅट, पार्किंगमध्ये अलिशान कार आणि बँकेत मोठ्या रकमेची एफडी असं स्वप्न तुम्हीही कधीतरी पाहिलच असेल. पण, हे स्वप्न पूर्ण करणे फक्त जास्त पगार असणाऱ्या लोकांसाठीच सोपे आहे असे नाही. आर्थिक नियोजन, शिस्त आणि गुंतवणुकीच्या योग्य फॉर्म्युल्याने कमी पगार असणारी व्यक्तीही हे स्वप्न पूर्ण करू शकते. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, तुम्ही फक्त २५ हजार रुपये पगार असूनही कोट्यधीश होऊ शकता आणि तुमच्या स्वप्नातील घर-गाडी घेऊ शकता. यासाठी गुंतवणूक तज्ज्ञांनी काही टीप्स दिल्या आहेत.
एसआयपीची ताकदएसआयपी हा शब्द तुमच्या कानावर अनेकदा पडला असेल. एसआयपी म्हणजे शिस्तबद्ध पद्धतीने म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे. तज्ज्ञांच्या फॉर्म्युल्यानुसार, कमी पगार असला तरीही तुम्ही दर महिन्याला थोडी बचत करून ती शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवली, तर तुमच्या आर्थिक परिस्थितीत मोठा बदल होऊ शकतो.
यासाठी, तुम्ही तुमच्या २५ हजार रुपयांच्या पगारातून दर महिन्याला फक्त ५ हजार रुपये बाजूला काढून एसआयपीमध्ये गुंतवा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, दरवर्षी तुमच्या गुंतवणुकीची रक्कम २० टक्क्यांनी वाढवत रहा. सरासरी १५% परतावा गृहीत धरल्यास, पुढील १५ वर्षांत तुमच्याकडे तब्बल १.५ कोटी रुपयांचा मोठा फंड तयार होऊ शकतो.
आता वापरा एसडब्ल्यूपीचा फॉर्म्युलातुम्ही एसआयपीद्वारे जमा केलेला १.५ कोटी रुपयांचा फंड आता एसडब्ल्यूपीमध्ये ट्रान्सफर करू शकता. एसडब्ल्यूपी म्हणजे एका मोठ्या गुंतवणुकीतून दर महिन्याला ठराविक रक्कम मिळवणे, आणि उर्वरित रक्कम वाढत राहते. या फॉर्म्युल्यानुसार, एसडब्ल्यूपीच्या माध्यमातून तुम्हाला पुढील ३० वर्षांसाठी दरमहा २ लाख रुपयांपर्यंत मासिक उत्पन्न मिळू शकते. या मिळणाऱ्या रकमेतून तुम्ही तुमच्या स्वप्नातील घर आणि गाडीचे हप्ते सहजपणे भरू शकता.
नियोजन आणि चक्रवाढ व्याजाचा फायदाया गुंतवणुकीच्या यशासाठी शिस्त, संयम आणि सातत्य खूप महत्त्वाचे आहे. एसआयपी ही एक दीर्घकालीन गुंतवणूक प्रक्रिया आहे, जी चक्रवाढ व्याजाच्या मदतीने तुमच्या छोट्या बचतीला एका मोठ्या फंडात बदलते. योग्य गुंतवणुकीची निवड करून तुम्ही तुमच्या आर्थिक उद्दिष्टांपर्यंत नक्कीच पोहोचू शकता.
वाचा - GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)