Join us
Daily Top 2Weekly Top 5

याला म्हणतात शेअर...! 2 दिवसांत दिला 40% चा बंपर परतावा; तुमच्याकडे आहे का? 'ट्रंप टॅरिफ डील'चा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 17:35 IST

...अर्थात गेल्या दोन सत्रांतच या शेअरने जवळपास  ४०% परतावा दिला. खरे तर, भारत-अमेरिकेच्या ऐतिहासिक व्यापार कराराने या क्षेत्राला पुन्हा झळाळी मिळताना दिसत आहे.

भारतीयशेअर बाजारात आज टेक्सटाईल क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी दिसून आली. यात गोकुळदास एक्सपोर्ट्सच्या शेअरने सर्वांचेच लक्ष वेधले. या शेअरने एकाच दिवसात १८% पेक्षा अधिक तेजी दिसून आली, तर गत सत्रात या शेअरमध्ये जवळपास २०% वाढ झाली होती. अर्थात गेल्या दोन सत्रांतच या शेअरने जवळपास  ४०% परतावा दिला. खरे तर, भारत-अमेरिकेच्या ऐतिहासिक व्यापार कराराने या क्षेत्राला पुन्हा झळाळी मिळताना दिसत आहे.

असा आहे व्यापार करार - भारत आणि अमेरिका यांच्यातील नव्या करारानुसार, भारतीय उत्पादनांवर लावण्यात येणारा २५% कर आता १८% वर आणण्यात आला आहे. याशिवाय, रशियन कच्च्या तेलाच्या आयातीविरोधात लावण्यात आलेले अतिरिक्त २५% शुल्कही हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा करार तत्काळ लागू होणार असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले आहे. महत्वाचे म्हणजे, भारतीय टेक्सटाईल कंपन्यांची ५० ते ७०% कमाई अमेरिकेतून होते. यामुळे या निर्णयाचा परिणाम बाजारावर दिसत आहे.

बजेटचाही परिणाम - केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ मधील एका घोषणेमुळेही हा परिणाम जणवत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 'चॅलेंज मोड'वर मेगा टेक्सटाईल पार्क विकसित करण्याची घोषणा केली आहे. या पार्क्समध्ये उत्पादन, व्हॅल्यू ॲडिशन आणि निर्यातीसाठी एकाच ठिकाणी सुविधा उपलब्ध असतील, यामुळे गुंतवणूक आणि रोजगार वाढण्यास मदत होईल.

या शेअर्समध्ये दिसली तेजी -गोकुळदास एक्सपोर्ट्स शिवाय, किटेक्स गारमेंट्स, ट्रायडंट, केपीआर मिल्स, इंडो काउंट इंडस्ट्रीज आणि वेल्सपन लिव्हिंग यांसारख्या शेअर्समध्येही हालचाल दिसून आली.

English
हिंदी सारांश
Web Title : Textile Stocks Surge: Gokaldas Exports Skyrockets on Trade Deal Hopes

Web Summary : Textile stocks surged after the India-US trade deal lowered tariffs. Gokaldas Exports led the rally, gaining nearly 40% in two sessions. Budget announcements for textile parks also boosted investor confidence in the sector.
टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकडोनाल्ड ट्रम्पभारतअमेरिका