Join us

भारतातून अमेरिका, ब्रिटनला प्रत्येकी ८० विमाने जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2020 03:48 IST

निर्णय : वंदे भारत मोहिमेचा तिसरा टप्पा

नवी दिल्ली : अमेरिका व ब्रिटन प्रवासासाठी मागणी लक्षात घेता केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने वंदे मातरम मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात या देशांसाठी एअर इंडियाच्या विमानांची संख्या वाढविली आहे. त्यानुसार भारतातूनअमेरिका, कॅनडाला जाणाºया विमानांची संख्या ८० करण्यात आली आहे. तितकीच विमाने ब्रिटनसह युरोपमध्येही जाणार आहेत.

केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, लंडन व युरोपातील दोन ठिकाणी भारतातून दररोज दोन विमाने ३० जूनपर्यंत रवाना होतील. अमेरिका-कॅनडाला यापूर्वी एअर इंडियाची ७० विमाने जात होती. त्यामध्ये १० विमानांची वाढ झाली आहे. अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी वंदे भारत मोहिमेचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे.त्यातील एअर इंडिया विमानांच्या तिकीटांची आरक्षण प्रक्रि या गुरु वारी दुपारी 3 वाजल्यापासून सुरू झाली. ही तिकीटे बुकिंग कार्यालये तसेच कॉल सेंटरवरही उपलब्ध असतील. मात्र वंदे भारत मोहिमेच्या अंतर्गत चालविली जाणारी विमाने वगळता भारताने अद्यापही आंतरराष्ट्रीय विमानसेवा स्थिगतच ठेवली आहे.वंदे भारत मोहिमेच्या अंतर्गत केंद्र सरकारने एअर इंडिया व तिची उपकंपनी एअर इंडिया एक्स्प्रेस यांची आंतरराष्ट्रीय विमानसेवा७ मेपासून सुरू केली होती. या मोहिमेचा पहिला टप्पा ७ ते १६ मे या कालावधीत पार पडला. विदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने वंदे भारत मोहिमेत ७ मे ते १ जून या कालावधीत ४२३ विमाने आंतरराष्ट्रीय मार्गावर चालविली. त्याद्वारे ५८,८६७ भारतीयांना पुन्हा मायदेशात आणले.

टॅग्स :अमेरिकाभारतएअर इंडिया